शरद पवार आणि १९९३चा बॉम्बस्फोट; ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं होतं?

मुंबई तक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ट्विट’हल्ला’ चढवला. गंभीर आरोप करताना फडणवीसांनी शरद पवारांवर १९९३ च्या बॉम्बस्फोटात खोटं बोलल्याचाही आरोप केला. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्द चर्चेत आला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वर्ष होतं १९९३! दिवस १२ मार्च. याच दिवशी मुंबईत तब्बल बारा बॉम्बस्फोटांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ट्विट’हल्ला’ चढवला. गंभीर आरोप करताना फडणवीसांनी शरद पवारांवर १९९३ च्या बॉम्बस्फोटात खोटं बोलल्याचाही आरोप केला. त्यामुळे पुन्हा एकदा हा मुद्द चर्चेत आला आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

वर्ष होतं १९९३! दिवस १२ मार्च. याच दिवशी मुंबईत तब्बल बारा बॉम्बस्फोटांनी हादरली. दुपारी १.३० वाजता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या २८ मजली इमारतीत पहिला स्फोट झाला. त्यानंतर पुढच्या दोन तासांत एअर इंडिया बिल्डिंग, शिवसेना भवन, शेअर बाजार, सेंच्युरी बाजार, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस, काथा बाजार, हॉटेल सी रॉक, मुंबई विमानतळ १२ ठिकाणी स्फोट घडवण्यात आले. याचवेळी पवारांनी १२ नव्हे, तर १३ स्फोट झाल्याचं सांगितलं होतं.

मुंबईत बॉम्बस्फोट झाले, त्याआधीच मुंबईत अशांतता होती. १९९२ मध्ये बाबरी मशिद पाडण्यात आली. त्यानंतर देशात उसळलेल्या दंगलीच्या झळा मुंबईला बसल्या होत्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वात काँग्रेसकडून बदल केले गेले. केंद्रात संरक्षणमंत्री असलेले पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रीपदाची सुत्रं स्वीकारल्यानंतर ६ दिवसानंतर म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी मुंबई हादरली.

खोटं बोलण्यामागे पवारांनी काय दिलेलं आहे कारण?

हे वाचलं का?

    follow whatsapp