Vikram Vedha: Saif Ali Khan ‘माझ्या मुलाचं नाव मी ‘राम’ का ठेवू?’, सैफचं वक्तव्य, करिनाही झाली ट्रोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ चित्रपट 30 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मात्र रिलीजच्या दोन दिवस आधीपासून पुन्हा एकदा चित्रपटाबाबत विरोध सुरू झाला असून यावेळी कारण आहे सैफ अली खान.

सैफ अली खानवरती भडकले लोक

वास्तविक, विक्रम वेधाच्या रिलीजपूर्वी सैफ अली खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. व्हिडिओमध्ये सैफ अली खान आपल्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही, असे म्हणत आहे. याच व्हिडिओमध्ये करीना देखील दिसत आहे, ज्यामध्ये ती आपल्या मुलाचे नाव घेऊन मुघलांची स्तुती करताना दिसत आहे. सैफ आणि करिनाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर यूजर्स कपलवरती राग व्यक्त केला आहे.

सैफ अली खान व्हिडिओमध्ये म्हणत आहे ‘मी माझ्या मुलाचे नाव सिकंदर ठेवू शकत नाही तसेच त्याचे नाव रामही ठेवू शकत नाही, मग चांगले मुस्लिम नाव का नाही?’ तथापि, व्हिडिओमध्ये सैफ अली खान असेही म्हणत आहे की तो आपल्या मुलांना धर्मनिरपेक्ष मूल्यांसह वाढवणार आहे, जिथे ते एकमेकांचा आदर करायला शिकतील. मात्र सैफला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सैफ अली खानच्या या व्हिडिओ बरोबर त्याची पत्नी करीना कपूर खानची व्हिडिओ क्लिपही जोडण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, दुलकर सलमान एका रिअॅलिटी शोमध्ये पाहुणे म्हणून येतो, सोनम कपूर त्याला विचारते – दुलकरचा अर्थ काय? यावर अभिनेता म्हणतो – हे अरबी नाव आहे. हे नाव अलेक्झांडरसारखेच आहे. यावर करीना म्हणते- ओ… योद्धासारखं.. म्हणजे तैमूरसारखं.

पाहा सैफ व्हिडिओमध्ये काय म्हणत आहे

विक्रम वेधा चित्रपटाचा होतोय विरोध

सैफ अली खानचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक युजर्स अभिनेत्यावर आपला राग व्यक्त करत आहेत आणि त्याच्या विक्रम वेधा या चित्रपटावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा आहे. एका युजरने लिहिले – त्याची पत्नी करीना कपूर आहे आणि ती आपल्या मुलाचे नाव राम ठेवू शकत नाही. हे का?

ADVERTISEMENT

एका युजरने लिहिलं आहे की विक्रम वेधा तो पिट गई, टाटा बाय-बाय

ADVERTISEMENT

‘विक्रम वेधा’ हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तमिळ चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. मूळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘विक्रम वेधा’चे दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केले आहे. तो एक अॅक्शन-थ्रिलर आहे. ‘विक्रम वेधा’ ची कथा एक कडक पोलीस अधिकारी विक्रम (सैफ अली खान) आणि एक खतरनाक गँगस्टर वेधा (ऋतिक रोशन) यांची आहे. या चित्रपटात हृतिक आणि सैफ व्यतिरिक्त राधिका आपटे, रोहित शराफ, शारिब हाश्मा, योगिता बिहानी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT