मंगळवारीच शरद पवारांवर का करण्यात आली शस्त्रक्रिया? डॉक्टरांनी सांगितलं कारण

मुंबई तक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असं ठरलं होतं. मात्र ती शस्त्रक्रिया मंगळवारी रात्रीच करण्यत आली. शरद पवार यांची प्रकृती आता चांगली आहे. पाच ते सहा दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा त्यांची कामं करू शकतील असंही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अमित मायदेव यांनी याबाबत माहिती दिली आहे.अमित मायदेव हे कन्सल्टंट ग्रॅस्टोनोलॉजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असं ठरलं होतं. मात्र ती शस्त्रक्रिया मंगळवारी रात्रीच करण्यत आली. शरद पवार यांची प्रकृती आता चांगली आहे. पाच ते सहा दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा त्यांची कामं करू शकतील असंही त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अमित मायदेव यांनी याबाबत माहिती दिली आहे.अमित मायदेव हे कन्सल्टंट ग्रॅस्टोनोलॉजी म्हणून ग्लोबल रूग्णालयात काम करतात. ब्रीचकँडी रूग्णालयात शरद पवार यांना दाखल करण्यात आल्यानंतर अमित मायदेव यांनीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया बुधवारी होणार होती. मात्र ती मंगळवारी रात्रीच करण्यात आली त्याचं कारण डॉक्टर मायदेव यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवार ते मुख्यमंत्री ठाकरे… ममतादीदींनी देशातील बड्या नेत्यांना लिहलं पत्र!

नेमकं काय म्हणाले डॉक्टर?

शरद पवार यांच्या पिताशयाच्या पिशवीत आणि नलिकेत दोन्हीकडे स्टोन होते. पित्ताशयाच्या पिशवीत स्टोनचं प्रमाण जास्त होतं, तसंच पित्ताशयाच्या नलिकेत एक स्टोन होता. मंगळवारी त्यांना होणाऱ्या वेदना वाढल्या.. शरद पवार यांना पोटदुखी आणि पाठदुखी असे दोन्ही त्रास जाणवू लागले. त्यामुळे आम्ही आणखी काही चाचण्या केल्या. त्या चाचण्यांना MRCP टेस्ट असं म्हणतात. या टेस्टमुळे पित्ताशय, जठर यांचं कार्य.. त्यांच्या नलिकांचं कार्य हे व्यवस्थित सुरू आहे की नाही याची स्पष्ट कल्पना येते. ही चाचणी केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की पित्ताशयाच्या नलिकेत असलेला स्टोन हा त्या नलिकेच्या तोंडाशी आला आहे. त्यामुळे आम्हाला शरद पवारांवर मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

हे वाचलं का?

    follow whatsapp