चंद्रपूर : बहिणीच्या दिरासोबत जुळले प्रेमसंबंध, आईच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात पती, पत्नी और वो चा हिंसक प्रकार समोर आला आहे. पत्नीने प्रियकर आणि आपल्या आईच्या मदतीने मद्यपी पतीची हत्या करुन त्याचं शव पोत्यात भरुन नदीच्या किनारी सोडून दिलं. पोलिसांनी फोन रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांवरुन कसून चौकशी करत या प्रकरणात पत्नीसह तिची आई आणि प्रियकराला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत मारुती […]
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात पती, पत्नी और वो चा हिंसक प्रकार समोर आला आहे. पत्नीने प्रियकर आणि आपल्या आईच्या मदतीने मद्यपी पतीची हत्या करुन त्याचं शव पोत्यात भरुन नदीच्या किनारी सोडून दिलं. पोलिसांनी फोन रेकॉर्ड आणि इतर पुराव्यांवरुन कसून चौकशी करत या प्रकरणात पत्नीसह तिची आई आणि प्रियकराला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत मारुती काकडे हा सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होता. मारुती मद्यपी असल्यामुळे त्याचं आपल्या बायकोशी सारखं भांडण व्हायचं. या भांडणामुळे प्राजक्ताचे आपल्या बहिणीचा दीर संजय टीकलेसोबत अनैतिक संबंध जुळले. यानंतर दोघांनीही मारुतीचा काटा काढण्याचं ठरवलं. मारुतीनंतर त्याच्या जागेवर सरकारी नोकरी मिळवून प्राजक्ताने संजयसोबत लग्न करण्याचं ठरवलं होतं.
मारुतीची हत्या करण्यासाठी आरोपींनी अत्यंत सफाईदारपणे कट रचला. संजयचा एक साथीदार विकासने मारुतीच्या घरी जाऊन भाड्याने घर मिळेल का याबाबत विचारणा केली. तसेच यावेळी विकासने मारुतीला दारु पाजण्याचं आमिष दाखवून नकोडा परिसरात आणलं. दारुच्या नशेत धुंद झाल्यानंतर तिकडेच मारुतीचा गळा आवळून खून करण्यात आला. परंतू पतीची सरकारी नोकरी डोळ्यासमोर असल्यामुळे प्राजक्ता आणि आरोपींनी मारुतीचा मृतदेह पोलिसांना सापडेल अशी व्यवस्था केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांनी मारुतीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स आणि आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले. यानंतर संशय बळावल्यामुळे पोलिसांनी पत्नी प्राजक्ताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. यावेळी चौकशीदरम्यान सर्व खरा प्रकार समोर आला. पोलिसांनी यानंतर प्राजक्ताची आई कांता, प्रियकर संजय आणि त्याचा साथीदार विकासला अटक केली आहे.
ADVERTISEMENT