आतापर्यंत माझा संयम पाहिलात पण यापुढे…Maratha Reservation वरुन संभाजीराजेंचा सरकारला इशारा
शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त रायगडावरील सोहळ्याला हजर राहिलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन एल्गार केला आहे. मी संयमी आहे, आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिलात, पण यापुढे संयम ठेवला जाणार नाही. समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यापुढे आरक्षणासाठी आंदोलन निश्चीत आहे असं म्हणत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. Shivrajyabhishek Din 2021 : शिवराज्याभिषेक […]
ADVERTISEMENT
शिवराज्याभिषेक दिनानिमीत्त रायगडावरील सोहळ्याला हजर राहिलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन एल्गार केला आहे. मी संयमी आहे, आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिलात, पण यापुढे संयम ठेवला जाणार नाही. समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यापुढे आरक्षणासाठी आंदोलन निश्चीत आहे असं म्हणत संभाजीराजेंनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
Shivrajyabhishek Din 2021 : शिवराज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न
येत्या १६ जूनला कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची मराठा आरक्षणासंदर्भात पहिली जबाबदारी आहे म्हणून मराठा जनतेने रस्त्यावर उतरु नये असं आवाहनही यावेळी संभाजीराजेंनी केलं. खासदार लोकसभेचा पगार घेतात, आमदार विधानसभेचा पगार घेतात….पण एकही नेता यावेळी पुढे आला नाही. मराठा आरक्षण ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही यावर बोललं पाहिजे. आताच्या सरकारला हात जोडून विनंती केली पण तरीही काहीही फरक पडत नाही. त्यामुळे आता संयम ठेवता येणार नाही असं म्हणत संभाजीराजेंनी राज्य सरकारला आव्हान दिलं आहे.
हे वाचलं का?
मराठा समाजाला गृहीत धरायचं काम राज्य सरकारने करु नये. आम्हाला तुमच्या राजकारणात आणि भांडणात रस नाही, आरक्षण कधी मिळणार आणि त्यासाठी उपाय काय याबद्दल माहिती द्या. कोरोनाची लाट आटोक्यात आल्यानंतरही मराठा आरक्षणासाठी ठोस पावलं उचलली गेली नाहीत. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर सकल मराठा समाच मुंबईत शिरेल. तिकडे तुम्हाला लाठी मारायची असेल तर पहिले छत्रपतींच्या वंशजांवर लाठी चालवा असं संभाजीराजेंनी म्हटलंय. त्यामुळे राज्य सरकारचे मंत्री आता संभाजीराजेंच्या भूमिकेवर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Maratha Reservation : मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही – संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT