मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (Mumbai Lockdown) लागणार का? अशी भीती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील नेमके प्रश्न ‘मुंबई तक’ने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Bmc Commissioner Iqbal Singh Chahal) यांना विचारले आहेत. मुंबई तकला दिलेल्या Exclusive मुलाखतीत चहल यांनी स्पष्ट […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन (Mumbai Lockdown) लागणार का? अशी भीती मुंबईकरांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील नेमके प्रश्न ‘मुंबई तक’ने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Bmc Commissioner Iqbal Singh Chahal) यांना विचारले आहेत. मुंबई तकला दिलेल्या Exclusive मुलाखतीत चहल यांनी स्पष्ट केलं आहे की, लॉकडाऊन लावण्याची शासनाची अजिबात इच्छा नाही.
दुसरी लाट असली तरीही मुख्यमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेचा विचार करता फक्त रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लावली आहे. त्यामुळे हे एक बंधन वगळता सगळे व्यवहार आपल्याकडे सुरु आहेत. लोकल ट्रेन, बसेस देखील सुरु राहणार आहेत. शिवाय लोकांनी कोरोनासंबंधी नियम पाळले तर लॉकडाऊनची वेळ आपल्यावर येणारच नाही’ अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली आहे.
लॉकडाऊनविषयी मुंबईकरांच्या मनातील असणाऱ्या प्रश्नांची नेमकी उत्तरं जाणून घेण्यासाठी आयुक्त इकबाल चहल यांची ही संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी…
प्रश्न: मुंबईमध्ये दिवसाला 1 लाख लसीकरणाचं तुमचं टार्गेट होतं ते पूर्ण होतंय का? आणि कोरोनाच्या केसेस वाढत आहेत त्यांच कारण आहे?