आता सुप्रीम कोर्टाचा कारभार मराठी माणसाच्या हाती? , न्यायमुर्ती लळित कोण आहेत?
नवी दिल्ली: सध्या महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात सुरू आहे. अशातच एक महत्वाची आणि अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्राचे सुपूत्र सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मराठी असलेले न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजजू यांच्याकडे केली आहे. नियुक्ती झाल्यास उदय उमेश लळित हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: सध्या महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात सुरू आहे. अशातच एक महत्वाची आणि अभिमानास्पद बाब म्हणजे, महाराष्ट्राचे सुपूत्र सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होणार आहेत. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मराठी असलेले न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजजू यांच्याकडे केली आहे. नियुक्ती झाल्यास उदय उमेश लळित हे देशाचे ४९ वे सरन्यायाधीश असतील. पण, न्यायमूर्ती लळीत नेमके कोण आहेत? त्यांचा जीवनप्रवास कसा आहे? त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय कोणते होते? हे जाणून घेऊयात…
न्यायमूर्ती उदय उमेश लळित हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे सुपूत्र आहेत. गिर्ये-कोठारवाडी इथं त्यांचं मूळ घर आहे. त्यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५७ ला झाला. लळीत घराण्यालाच वकिलीचा वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा, वडील, काका सर्वच वकिलीच्या व्यवसायात होते. उदय यांचे वडील उमेश लळित हे देखील वकील होते. तसेच ते मुंबई उच्च न्यायायलयाच्या नागपूर खंडपीठाचे अतिरिक्त न्यायमूर्ती देखील होते. त्यामुळे न्यायमूर्ती उदय लळित देखील वकिलीकडे वळले. त्यांचं शिक्षण मुंबईत झालं. त्यांनी जून १९८३ मध्ये वकिली सुरू केली.
१९८५ पर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयात होते. त्यानंतर १९८६ ला मुंबईतून दिल्ली उच्च न्यायालयात गेले. त्यांनी दिल्लीत सहा वर्षे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. ते २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम करतायत. आता ते भारताचे सरन्यायाधीश होणार आहेत. न्यायमूर्ती लळित हे न्यायमूर्ती एस. एम सिकरी यांच्यानंतर दुसरे असे सरन्यायाधीश असतील ज्यांना बार असोसिएशनमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती देण्यात आली होती.
अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उदय लळित यांचा सहभाग