Ropeway Accident: जीव वाचणार म्हणून महिला पुढे सरसावली अन् थेट 1500 फुटावरुन खाली कोसळली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Deoghar Rope Way Accident: झारखंडच्या देवघरमध्ये रोप-वे अपघातात बचावकार्य अद्यापही सुरू आहे. पण या बचावादरम्यान पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा तब्बल 1500 फुटावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माबिला ट्रॉलीच्या केबिनमधून लिफ्ट करुन महिलेला सुरक्षित ठिकाणी आणण्यात येत होतं. पण दरीच्या मधोमध आल्यानंतर महिला अचानक खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

झारखंडमध्ये रोप-वे अपघात (Rope Way Accident In Jharkhand): या अपघातात आतापर्यंत तीन महिला आणि एका तरुणासह एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दरी कोसळून मृत्यू झालेल्या शोभा देवी असं मृत महिलेचं नाव असून ती झांसागढी येथील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या मदतीने रोप-वे ट्रॉली क्रमांक 7 मधून लोकांना बाहेर काढले जात होते. यादरम्यान एका महिलेला हेलिकॉप्टरमधून वर नेण्याऐवजी केबिनच्या मदतीने खाली उतरवले जात होते.

हे वाचलं का?

यादरम्यान दोरीला जोरदार धक्का बसला. महिला ज्या दोरीला लटकली होती ती दोरी केबिनमध्ये कुठेतरी अडकली होती आणि तेव्हाच केबिनला लटकलेल्या महिलेला जोरदार धक्का बसला होता आणि ती थेट खाली कोसळली.

ADVERTISEMENT

सोमवारी बचाव कार्यादरम्यान दुमका येथील एक तरुण हेलिकॉप्टरमधून सुमारे 2000 फूट उंचीवरून खाली पडला होता. ज्याचा देखील जागीच मृत्यू झाला होता. तर यापूर्वी रविवारी दोन महिलांचा मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

नेमकी दुर्घटना काय?

रविवारी संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. त्रिकूट रोपवेच्या दोन ट्रॉलीज एकमेकांमध्ये धडकल्या. त्यानंतर हे लोक एका डोंगरावर अडकले. रात्रीपासून एनडीआरएफचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. तसंच लष्कराचीही मदत बोलावली गेली. मात्र अद्यापही हे लोक त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांची आता हळूहळू सुटका करण्यात येत आहे.

रविवारी सकाळी रामनवमीची पूजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी शेकडो पर्यटक आले होते. रोप-वेची एक ट्रॉली खाली येत होती आणि तेव्हाच एक ट्रॉली वर जात होती. या ट्रॉलींची टक्कर झाली. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले. जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा दोन डझन म्हणजेच 24 ट्रॉली हवेत होत्या. घाईगडबडीने काही लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं.

झारखंड-त्रिकूट रोपवे दुर्घना : २० तासांपासून हवेत लटकले ४८ लोक, बचावकार्यात अडथळे

या घटनेला 40 तास उलटून गेले आहेत. तरीही अनेक जण हवेतच लटकलेल्या अवस्थेत आहेत. हे सगळेजण 18 ट्रॉलींमध्ये आहेत. लष्कराचं हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहचलं मात्र हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या वेगाने 18 ट्रॉलीज हलू लागल्या. त्यामुळे आता या ट्रॉलीजमध्ये अडकलेल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या प्रकरणी जिल्हा कलेक्टर मंजूनाथ भैजंत्री यांनी सांगितलं की सध्या आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून रोपवे बंद ठेवला आहे. ट्रॉली सरकल्याने दुर्घटना झाली. जखमी झालेल्या लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT