ठाणेजवळ लोकल ट्रेनमध्ये मोबाइल चोरासोबत झटापट, महिलेचा ट्रेनखाली येऊन दुर्देवी मृत्यू
ठाणे: लोकलच्या महिला डब्यात कोणताही गुन्हेगार अगदी सहज शिरून गुन्हा करून फरार होऊ शकतो हेच पुन्हा समोर आलं आहे. महिला डब्यातील महिला प्रवाशी आजही सुरक्षित नाहीत अशीच घटना ठाण्यात घडली आहे. कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमध्ये मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत रेल्वेखाली येऊन विद्या पाटील (वय 35) वर्ष यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. […]
ADVERTISEMENT

ठाणे: लोकलच्या महिला डब्यात कोणताही गुन्हेगार अगदी सहज शिरून गुन्हा करून फरार होऊ शकतो हेच पुन्हा समोर आलं आहे. महिला डब्यातील महिला प्रवाशी आजही सुरक्षित नाहीत अशीच घटना ठाण्यात घडली आहे. कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमध्ये मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत रेल्वेखाली येऊन विद्या पाटील (वय 35) वर्ष यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी फैजल शेख या सराईत गुन्हेगाराला मुंब्रा भागातून अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे या आरोपीवर याआधी तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर महिला रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अनेक ठिकणी महिलांसंबंधित गुन्हे घडतात आणि त्यानंतर महिलांबाबत सुरक्षा वाढवली जाते. असेच काहीसे रेल्वे विभागात ही बघायला मिळतं. अनेक दुर्घटना महिला रेल्वे डब्यात घडल्यानंतर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. परंतु सध्याच्या घडीला हे सुरक्षा रक्षक डब्यात असतात का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धक्कादायक… साताऱ्यात 12 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरडाओरड करताच नराधमाने मुलीला ट्रेनमधून फेकलं