बेबी बंप नाही, पीरियड्स होते सुरू…महिलेची अचानक बाथरूममध्येच झाली डिलिव्हरी!
Woman gave birth to child in Bathroom : मार्ला मैकएंटायर या 34 वर्षाच्या महिलेला अचानक पोटात तीव्र वेदना होत होत्या. या वेदनेमुळे तिने थेट बाथरूममध्ये धाव घेतली होती. यावेळी तिने बाथरूममध्येच एका बाळाला (New Born Baby) जन्म दिला.
ADVERTISEMENT
Woman gave birth to child in Bathroom : एखादी महिला जर प्रेग्नेंट (Women pregnant) असेल तर काही महिन्यांनी तिचे पोट दिसू लागते. तिच्या प्रेग्नेंसी टेस्टमध्ये (Pregnancy Test) देखील ती प्रेग्नेंट असल्याचा दिसून येते. मात्र इतकं सगळ नसून सुद्धा एका महिलेने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडलीय. विशेष म्हणजे, ज्या दिवशी महिलेने बाळाला जन्म दिला त्याच दिवशी तिला ती प्रेग्नेंट असल्याची माहिती मिळाली होती. या घटनेने डॉक्टरांनाही (Doctors) आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे.(women gave birth to child in bathroom no baby bump regular periods doctors also shock)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
मार्ला मैकएंटायर या 34 वर्षाच्या महिलेला अचानक पोटात तीव्र वेदना होत होत्या. या वेदनेमुळे तिने थेट बाथरूममध्ये धाव घेतली होती. यावेळी तिने बाथरूममध्येच एका बाळाला (New Born Baby) जन्म दिला. नवजात बाळाच्या जन्मानंतर तिने जे सांगितले यावर कोणाचा विश्वास बसत नाही आहे. डॉक्टर (Doctors) देखील हा प्रकार एकूण आश्चर्यचकीत झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर मार्लाने एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत तीने तिची प्रेग्नेंन्सीची स्टोरी सांगितली आहे. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हे ही वाचा : आई शप्पथ! अंपायरने दिला ‘नो बॉल’, त्याने चाकूने भोकसले; मैदानावर घडला थरार; मैदानावर घडला थरार
व्हिडिओत काय म्हणाली?
मार्ला मैकएंटायरने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने प्रेग्नेंन्सीची स्टोरी (Pregnancy) सांगितलीय. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मला अचानक पोटात दुखू लागले होते. अॅसिडिटीमुळे पोटात दुखत असल्याचा तिचा समज होता, मात्र हा समज चुकीचा ठरला. कारण पोटात दुखताच मार्ला जशी बाथरूममध्ये पोहोचली तशी तिची डिलीव्हरीच (Delivery) झाली. हे पाहून तिला देखील मोठा धक्का बसला. बाथरूममध्ये मुलाचा जन्म झाला. यानंतर मी लगेचच त्याला कवटाळले. तो 160 पाऊंडचा होता. आणि एकदम सामान्य आणि निरोगी वाटत होता, अशी माहिती मार्लाने दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
डॉक्टरांनाही प्रेग्नेंसी कळाली नाही
ऑगस्ट महिन्यात एकदा तिचे पिरीयड्स (Periods) मिस झाले होते. त्यावेळी प्रेग्नेंन्सी टेस्ट करण्यात आली होती, पण रिझल्ट निगेटीव्ह आला होता. या रिपोर्टनंतर मार्लाला खात्री पटली होती की ती प्रेग्नेट नाही आहे. तसेच काही दिवसांनी मार्लाचे पिरीयड देखील नियमित झाले होते. त्यामुळे ती निश्चित झाली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : इमारतीवरून पडलेली सळई तरूणाच्या शरीराच्या गेली आरपार
बेबी बंप (Baby Bump) देखील नव्हता, पोटावर बाळाची किक देखील बसत नव्हती. जानेवारी महिन्यात तिला पोटदुखीचा त्रास झाला होता. त्यावेळी डॉक्टरांनी बद्धकोष्ठता असल्याचे सांगितले होते. त्यावेळी डॉक्टरांना देखील मार्ला प्रेग्नेंट असल्याचे कळाले नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा फेब्रुवारी महिन्यात पोटात दुखू लागले, त्यावेळेस मार्लाने बाथरूममध्ये बाळाला जन्म दिला. या घटनेने डॉक्टर देखील आश्चर्यचकीत झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT