सुशील कुमारच्या अडचणीत वाढ, दिल्ली कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
२३ वर्षीय पैलवान सागर राणा याच्या हत्येप्रकरणात दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सुशील कुमारचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सुशील कुमार फरार आहे. Olympic पदक विजेत्या सुशील कुमारविरोधात दिल्ली पोलिसांकडून १ लाखांचं बक्षीस जाहीर अटकेपासून स्वतःला वाचवण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात […]
ADVERTISEMENT
२३ वर्षीय पैलवान सागर राणा याच्या हत्येप्रकरणात दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सुशील कुमारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सुशील कुमारचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सुशील कुमार फरार आहे.
ADVERTISEMENT
Olympic पदक विजेत्या सुशील कुमारविरोधात दिल्ली पोलिसांकडून १ लाखांचं बक्षीस जाहीर
अटकेपासून स्वतःला वाचवण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात धाव घेतली होती, परंतू त्याचा हा प्रयत्नही फोल ठरला आहे. दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी १ लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. ४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडीयममध्ये काही मल्लांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत काही मल्ल जखमी झाले होते.
हे वाचलं का?
यापैकी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान २३ वर्षीय सागर राणा याचा मृत्यू झाला. पैलवानांना झालेल्या मारहाणीत सुशील कुमारचा सहभाग असल्याचे पुरावे दिल्ली पोलिसांकडे आहेत. एक आठवड्यापूर्वी दिल्लीतील कोर्टाने या प्रकरणात ६ जणांविरोधात अजामिनपात्र वॉरंट जाहीर केलं. यानंतर यातील सर्व आरोपी फरार आहेत. सुशील कुमारला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्याच्या ठिकाणांवर छापेमारीही केली. परंतू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशील कुमार हरीद्वार आणि त्यानंतर ऋषिकेश येथे फरार झाला. दिल्ली पोलिसांना चकवा देण्यासाठी सुशील हरियाणात वारंवार आपली ठिकाणं बदलत असल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT