पुणे : ट्रान्सफार्मरमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांनी ट्रान्सफार्मरमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी रात्री ट्रान्सफार्मर तोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करायची. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातील ७ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ट्रान्सफार्मच चोरीच्या घटना समोर येत होत्या. परंतू तपास करुनही यात कोणताही सुगावा पोलिसांना सापडत नव्हता. अखेरीस सखोळ तपास केला असता यवत पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला. या टोळीने दौंड तालुक्यात १२ वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने चोरी केल्याचं समोर आलं आहे.

15 ऑक्टोबर रोजी ओम्नी व्हॅन पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती, जेव्हा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी लखन दोरके, सचिन बर्डे, इशराक अली, निवृत्ती खळदकर, सूर्यकांत खळदकर आणि सूरज जाधव या सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 160 किलो तांब्याच्या तारा आणि ओमनी व्हॅनसह 7 लाख 26 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अनेक ठिकाणी अशा घटना केल्या असल्याचा पोलिसांना संशय आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT