कल्याण: तरुणीसोबत शारीरिक संबंध, गर्भपात.. बोहल्यावर चढण्याअगोदर पोलिसांनी आवळल्या नवरदेवाच्या मुसक्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, कल्याण: मॅरेज इव्हेंट मॅनेजर असलेल्या तरुणीसोबत सोबत प्रेमसंबंध ठेवून दुसऱ्याच मुलीसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी लग्नाच्या काही तास आधीच अटक केल्याची घटना घडली आहे. अजय उर्फ विक्की फ्रान्सिस असं या नवरदेवाचं नाव असून तो रेल्वे कर्मचारी असल्याचं समजतं आहे.

कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी परिसरात राहणारा अजय उर्फ विक्की फ्रान्सिस हा कल्याण रेल्वे यार्डमध्ये कामाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते.

ही तरुणी मॅरेज इव्हेंट मॅनेजर आहे. अजयने या तरुणी सोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच तिचा गर्भपात केल्याचाही तरुणावर आरोप लावण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अजय हे कृत्य करत असल्याचं तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकीकडे लग्नाचं वचन देऊन आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा अजय हा दुसऱ्या तरुणीसोबत 29 डिसेंबरला लग्न करणार असल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक करण्यात आल्याचं जेव्हा तरुणीला समजलं तेव्हा तिने याबाबत तात्काळ पोलिसात धाव घेतली. तिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल केली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, तरुणीच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांचे एक पथक हे थेट अमरावती येथील बडनेरा येथे पोहचले.

ADVERTISEMENT

Crime News : विवाहितेने अनैतिक संबंध तोडले, शेजाऱ्याने चिमुकल्याला बादलीत बुडवून मारलं

ADVERTISEMENT

यावेळी अजयच्या लग्नाची तयारी सुरू होती. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अजय फ्रान्सिस या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आता याप्रकरणी आरोपी अजय फ्रान्सिस याला कल्याणला आणण्यात आलं असून कोळसेवाडी पोलीस हे पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT