Supriya Sule: पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट

मुंबई तक

Supriya Sules Saree Caught Fire: पुणे: पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने अचानक पेट (saree caught fire) घेतला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रंसगावधान राखत सुप्रिया सुळेंच्या साडीला लागलेली ही आग तात्काळ विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यातील एका कार्यक्रमात प्रतिमेचं पूजन करत असताना ही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Supriya Sules Saree Caught Fire: पुणे: पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या साडीने अचानक पेट (saree caught fire) घेतला. मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी प्रंसगावधान राखत सुप्रिया सुळेंच्या साडीला लागलेली ही आग तात्काळ विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यातील एका कार्यक्रमात प्रतिमेचं पूजन करत असताना ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेची दृश्यही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. (supriya sules saree caught fire at an event in pune)

सुप्रिया सुळे या आज (15 जानेवारी) पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे शहरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यासाठी सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. त्यातीलच एक कार्यक्रम हा बावधन या ठिकाणी होता.

शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा केला की ते सत्तेत येतात- सुप्रिया सुळे

कराटे प्रशिक्षण शिबीर उद्घाटनाचा हा कार्यक्रम सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होता याच कार्यक्रमात दीपप्रज्वलन पार पडत असताना तिथल्या दिव्याच्या वातीमुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानाक पेट घेतला. पण ही बाब सुप्रिया सुळे आणि मंचावरील कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने आग लगेचच विझविण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp