आधी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा, नंतर नॉट रिचेबल; छत्तीसगड काँग्रेसमध्ये चाललंय काय?
छत्तीसगडचे कॅबिनेट मंत्री टीएस सिंह देव यांनी शनिवारी पंचायत आणि ग्रामीण विकास खात्याचा राजीनामा दिला. सिंह देव यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना चार पानी पत्र लिहून खात्यातील हस्तक्षेपाचा आरोप केला होता. सिंह देव यांच्या राजीनाम्यानंतर छत्तीसगड काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत कलह सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी सीएम बघेल यांनीही सिंहदेव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, […]
ADVERTISEMENT

छत्तीसगडचे कॅबिनेट मंत्री टीएस सिंह देव यांनी शनिवारी पंचायत आणि ग्रामीण विकास खात्याचा राजीनामा दिला. सिंह देव यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना चार पानी पत्र लिहून खात्यातील हस्तक्षेपाचा आरोप केला होता. सिंह देव यांच्या राजीनाम्यानंतर छत्तीसगड काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत कलह सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी सीएम बघेल यांनीही सिंहदेव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी बोलणे होऊ शकले नाही.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले की, त्यांनी शनिवारी रात्री उशिरा कॅबिनेट मंत्री टीएस सिंहदेव यांच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता दिलेल्या राजीनाम्यात माजी पंचायत मंत्र्यांनी असा दावा केला की मुख्य सचिव अमिताभ जैन यांनी मुख्यमंत्री समग्र ग्रामीण विकास योजनेंतर्गत सचिवांची समिती स्थापन केली होती, जे विभागात मनमानी करत होते. या समितीकडूनच सर्व प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली जात होती.
टीएस सिंहदेव यांनी राजीनाम्यात काय लिहिले होते?
“प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील बेघर लोकांना घरे उपलब्ध करून द्यायची होती, त्यासाठी मी तुमच्याशी अनेकदा चर्चा करून बजेटसाठी विनंती केली, पण या योजनेसाठी रक्कम उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे 8 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. यामुळे राज्याची सुमारे 10 हजार कोटींची अर्थव्यवस्था सुधारली असती. सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात बेघरांसाठी एकही घर बांधता आलेले नाही, हे विशेष.
राज्य सरकारचे भविष्य ठरवणारा निकाल 20 जुलैला लागणार?, स्वतंत्र खंडपीठ स्थापन