गणेश नाईकांच्या अडचणी वाढणार? कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडणची वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी गणेश नाईकांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणी सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गणेश नाईकांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. काय आहे हे नेमकं प्रकरण? भाजप […]
ADVERTISEMENT

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडणची वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांप्रकरणी गणेश नाईकांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणी सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गणेश नाईकांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
काय आहे हे नेमकं प्रकरण?
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचा आरोप करत गणेश नाईकांपासून आपल्याला मुलगा असून त्याला वडीलांचं नाव मिळावं अशी मागणी केली होती. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली होती. पीडित महिलेने आमची डीएनए चाचणी करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही असं सांगितलं होतं.
राणा दाम्पत्याच्या जामिनाचा फैसला सोमवारी, आणखी दोन दिवस मुक्काम तुरुंगातच