Maharashtra Weather : 'या' जिल्ह्यात धुक्याची चादर, तर काही ठिकाणी थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता
Maharashtra Weather : राज्यात सध्या थंडीचा जोर कमी असून तापमानात सातत्याने चढ-उतार जाणवत आहे. सकाळी आणि रात्री काही ठिकाणी काही भागांत गारवा जाणवण्याची शक्यता आहे. तर दुपारी वेळेत उष्णतेचा त्रास जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीची शक्यता कमी राहणार असून तापमानात पुन्हा एकदा घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. अशातच 20 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसे राहील, याची माहिती जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात थंडीचा जोर कमी असून तापमानात सातत्याने चढ-उतार
20 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसे राहील?
Maharashtra Weather : राज्यात सध्या थंडीचा जोर कमी असून तापमानात सातत्याने चढ-उतार जाणवत आहे. सकाळी आणि रात्री काही ठिकाणी काही भागांत गारवा जाणवण्याची शक्यता आहे. तर दुपारी वेळेत उष्णतेचा त्रास जाणवत आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीची शक्यता कमी राहणार असून तापमानात पुन्हा एकदा घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे, असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. अशातच 20 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसे राहील, याची माहिती जाणून घेऊयात.
हे ही वाचा : 'जोवर मनसे आहे तोवर बिहार भवन होऊ देणार नाही', राज ठाकरेंचा 'शिलेदार' कडाडला
कोकण :
कोकण विभागात 20 जानेवारी रोजी दिवसा उष्णतेचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. तर सकाळी आणि रात्री सौम्य गारवा जाणवेल, मात्र दुपारी उकाडा जाणवू शकतो, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात थंडीवा जाणवणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि इतर परिसरात सकाळच्या सुमारास धुक्याची झालर असण्याची शक्यता आहे. तसेच सकाळी गारवा आणि दुपारी उष्णतेची लाट असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात सकाळच्या वेळेत हवामान थंड राहणार असून दुपारनंतर सूर्यप्रकाशामुळे उष्णता वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच मागील काही दिवसांपासून तापमानात सतत बदल होण्याची शक्यता आहे. तर रात्री गारवा आणि काही अंशी प्रमाणात गारवा कमी झालेला जाणवेल.