भीमा कोरेगाव प्रकरण : सुधा भारद्वाज यांना अखेर बॉम्बे हाय कोर्टाकडून दिलासा

भीमा कोरेगाव प्रकरण : सुधा भारद्वाज यांना अखेर बॉम्बे हाय कोर्टाकडून दिलासा

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारतद्वाज यांना बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुधा भारतद्वाज यांनी जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. सुधा भारतद्वाज यांना 8 डिसेंबरला विशेष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सुधा भारतद्वाज यांचे वकील मिहीर देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. सुधा भारतद्वाज यांना जामीन मंजूर झाला आहे. इतर आरोपींना जामीन दिला नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर सुधार भारतद्वाज यांना NIA कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.

भीमा कोरेगाव प्रकरण : सुधा भारद्वाज यांना अखेर बॉम्बे हाय कोर्टाकडून दिलासा
"एल्गार परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न"

कोण आहेत सुधा भारतद्वाज?

सुधा भारतद्वाज या अमेरिकेत जन्माला आल्या. त्या अकरा वर्षांच्या असताना भारतात आल्या. त्यांनी IIT मधून गणिताची पदवी घेतली. त्यांना परदेशातून पुढचं शिक्षण घेण्याची संधी होती पण त्यांनी तसं केलं नाही.

सुधा भारद्वाज यांच्यावर अर्बन नक्सल असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 6 जून 2018ला अटक केली. त्यांच्यासह अन्य काही वकील, लेखक आणि मानवी हक्क कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली होती.पुणे पोलीस या प्रकरणाची चौकशी करण्यात उशीर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरच अनेक प्रश्नं उपस्थित होत होते.

काय घडलं होतं 2018 ला?

1 जानेवारी 2018 रोजी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील दोन ते तीन दिवस सणसवाडीत तणावपूर्ण शांतता होती. मात्र, या घटनेचे पडसाद पुढील काही दिवसांमध्ये राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले. 1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगावच्या लढाईला 200 वर्ष पूर्ण झाली. ही लढाई इंग्रज आणि पेशवा दुसरा बाजीराव यांच्यात भीमा कोरेगाव या गावी झाली होती.

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास?

दुसरे बाजीराव पेशवे इंग्रजांच्या मदतीने 1803 ला पेशवेपदी विराजमान झाले. इंग्रजांनी त्यांच्यावर अतिशय अपमानकारक आणि जाचक अटी लादल्या. त्यामुळे पेशवे इंग्रजांविरुद्ध पेटून उठले 5 नोव्हेंबर1817 रोजी खडकी येथे पेशवे इंग्रजांकडून पराभूत झाले पण हा निर्णायक पराभव नव्हता पुढे 16 नोव्हेंबर 1817 ला येरवडा येथील लढाईत पण पेशवे पराभूत झाल्याने दुसरे बाजीराव फौजेसह शनिवारवाडा सोडून पळून गेले आणि इंग्रजांनी शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकविला पण साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह आणि पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी पंढरपूर येथे बाजीराव दुसराची भेट घेतली.

1 जानेवारी 1818 रोजी 500 महार सैनिकांनी कॅप्टन फ्रान्सिस स्टोनटन यांच्या नेतृत्वाखाली 3000 पेशव्यांचा भीमा कोरेगाव येथे पराभव केला यात 22 महार सैनिक 275 ब्रिटिश सैनिक तर पेशव्यांचे 600 सैनिक ठार झाले या विजयामुळे ब्रिटिशांनी महार सैनिकांचे कौतुक केले आणि त्याठिकाणी शौर्यस्तंभ उभा करून त्यावर शहीद झालेल्या सैनिकांची नावं त्यावर कोरली. या स्तंभाला आदरांजली देण्यासाठी बाबासाहेब दरवर्षी जात असत म्हणून लाखो भीमसैनिक दरवर्षी येथे जमतात.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in