सगळ्यांच्या चेहऱ्यांवरून Mask उतरवायचा आहे, पण… CM उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्याला आपला मास्क सुद्धा उतरवून ठेवायचा आहे… पण त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. आता आपण संयम ठेऊन शिस्तीने वागलो तरच आपल्याला कायमसाठी आपला मास्क उतरवता येणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना येथे बोलवा. त्यांना लोकांच्या रोजीरोटीसाठी काय करणार हे विचारा असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

एक लाख कोटी डॉलरची क्षमता गाठण्याच्या दिशेने सुरू असलेल्या राज्याच्या औद्योगिक महागाथेचा, औद्योगिक प्रगती आणि तिला पूरक पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह 2021’ चं आयोजन करण्यात आलं . या बहुसत्रीय परिषदेत राज्याच्या भविष्यातील वाटचालीचा वेध घेतला जात असून रूपरेखा मांडली गेली. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?

कोरोना काळात महाराष्ट्र सावरला ते श्रेय माझं एकट्याचं नाही माझे मंत्रिमंडळातील सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी, सगळे कर्मचारी अगदी सफाई कर्मचारीसुद्धा आणि साहजिकच आपल्या राज्यातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी दिलेली साथ ही महत्त्वाची ठरली. तुम्ही जी साथ देत आहात ती त्यावेळी दिली नसती तर हे कठीण होतं असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

Nitin Gadkari यांनी लिहिलेल्या पत्राबाबत उद्धव ठाकरे म्हणतात, लेटर आप बहुत..

ADVERTISEMENT

अर्थचक्र सुरु राहण्यासाठी उद्योग सुरु राहणे महत्वाचे आहे. हे आपण का करतो तर दोन घास शांततेने खाण्यास मिळण्यासाठी. त्या शेतकऱ्यांना जपणे ही शासनाची जबाबदारी आहे.पर्यटनातून रोजगार वाढतो म्हणून आपण या क्षेत्राला आदरातिथ्य उद्योगाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्राला सुंदर समुद्र किनारा लाभला, पुरातन मंदिरे महाराष्ट्रात आहेत, गडकिल्ले आहेत, जंगले आहेत. पण आपण अजूनपर्यंत पर्यटनाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिलेले नाही. या क्षेत्राकडे गांभीर्याने बघितलेलेच नाही.

काळाप्रमाणे रोजगाराची अनेक क्षेत्र उदयाला येत आहेत त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.

कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट महाराष्ट्राने अनुभवली. या दोन्ही लाटांमध्ये महाराष्ट्राने कोरोनाचा हाहाकार पाहिला. अशावेळी दुसऱ्या लाटेत अर्थचक्र सुरू राहिल अशा प्रकारे निर्बंध लावण्यात आले होते. 14 एप्रिल ते 15 ऑगस्ट या कालावधीत राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध होते. अशावेळी अर्थचक्र कसं सुरू राहिल या प्रमाणे निर्बंध होते. आता लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल ट्रेन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अर्थचक्र सुरू राहण्याची काळजी घेण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT