नागपूरच्या चोरांची अजब कहाणी, थंडीपासून बचाव करण्यासाठी चोरलेली बाईक जाळली
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. उप-राजधानी नागपूरमध्ये पारा चांगलाच घसरला आहे. थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेकजण स्वेटर, मफलर, कानटोपी, जॅकेट अशा विविध गोष्टींचा वापर करतात. अनेक ग्रामीण भागात उब घेण्यासाठी शेकोटीही केली जाते. परंतू नागपूरमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी एक वेगळा आणि धक्कादायक मार्ग चोरांच्या टोळीने स्विकारला आहे. दरोडेखोरांच्या एका […]
ADVERTISEMENT

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. उप-राजधानी नागपूरमध्ये पारा चांगलाच घसरला आहे. थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेकजण स्वेटर, मफलर, कानटोपी, जॅकेट अशा विविध गोष्टींचा वापर करतात. अनेक ग्रामीण भागात उब घेण्यासाठी शेकोटीही केली जाते. परंतू नागपूरमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी एक वेगळा आणि धक्कादायक मार्ग चोरांच्या टोळीने स्विकारला आहे.
दरोडेखोरांच्या एका टोळीने थंडीपासून स्वतःचं रक्षण व्हावं यासाठी स्वतः चोरलेली दुचाकी जाळल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.
पुणे: विमानाने पुण्यात यायचे अन् चोरी करायचे, श्रीमंत चोरटे कसे सापडले पोलिसांच्या जाळ्यात?