मुंबईकरांनो काळजी घ्या ! Corona ची तिसरी लाट शहरात दाखल – टास्क फोर्समधील सदस्याची माहिती
मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झालेली अचानक वाढ पाहता केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारनी आपापल्या राज्यात निर्बंध लागू केले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात राज्य सरकारने जमावबंदी लागू केली आहे. परंतू गेल्या काही दिवसांमधील रुग्णसंख्येतली वाढ पाहता पुन्हा लॉकडाउन लावलं जाण्याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्राच्या टास्क […]
ADVERTISEMENT

मुंबईसह देशातील अनेक महानगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झालेली अचानक वाढ पाहता केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारनी आपापल्या राज्यात निर्बंध लागू केले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात राज्य सरकारने जमावबंदी लागू केली आहे. परंतू गेल्या काही दिवसांमधील रुग्णसंख्येतली वाढ पाहता पुन्हा लॉकडाउन लावलं जाण्याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राच्या टास्क फोर्समधील महत्वाचे सदस्य डॉ. राहुल पंडीत यांनी मुंबई तक शी बोलताना मुंबई आणि दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आलेली असल्याचं सांगितलं. रुग्णवाढीचे हे आकडे चिंताजनक असल्याचंही अनेक तज्ज्ञांनी बोलून दाखवलं आहे. “सध्याच्या घडीला मुंबई आणि दिल्ली शहरात रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता कोरोनाची तिसरी लाट शहरात दाखल झाली आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे.”
Covid 19: महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
सध्याच्या घडीला रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता हे रुग्ण ओमिक्रॉनचे असल्याचं म्हणता येईल. परंतू आपण सध्याच्या घडीला जिनॉस सिक्वेन्सिंगचा अहवाल आल्यानंतरच या निष्कर्षापर्यंत येत आहोत. सध्याच्या घडीला जे रुग्ण सापडत आहेत त्यांच्या डेल्टा आणि ओमिक्रॉनचं मिश्रण असल्याचं चित्र दिसत आहे. येत्या १० दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवरुन आपल्याला सध्याच्या परिस्थितीचा अधिक स्पष्ट अंदाज येईल अशी माहिती डॉ. राहुल पंडीत यांनी दिली.