सायरस मिस्त्रींसोबत गाडीत होते एकाच कुटुंबातील तिघे; गाडी चालवणाऱ्या त्या प्रसिद्ध डॉक्टर कोण?
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींचा रविवारी कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांना देखील अपघातात आपला जीव गमवावा लागला. दोघे गाडीत पाठीमागच्या सीटवर बसले होते. तर गाडी डॉक्टर अनाहिता पंडोले चालवत होत्या व त्यांचे पती डॅरियस हे बाजूच्या सीटवर बसले होते. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जहांगीर […]
ADVERTISEMENT

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींचा रविवारी कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांना देखील अपघातात आपला जीव गमवावा लागला. दोघे गाडीत पाठीमागच्या सीटवर बसले होते. तर गाडी डॉक्टर अनाहिता पंडोले चालवत होत्या व त्यांचे पती डॅरियस हे बाजूच्या सीटवर बसले होते. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जहांगीर हे डॅरियस पंडोले यांचे लहान भाऊ होते.
मिस्त्री आणि पांडोले कुटुंबियांचे संबंध
डॅरियस पंडोले यांचं मिस्त्री कुटुंबांशी अतिशय जवळचं नातं आहे. सायरस मिस्त्री यांचे ते बालमित्र आहेत. कॅथड्रॉल जॉन कॅनॉन स्कुलमध्ये दोघे एकत्र शिकले. डॅरियस पंडोले हे ड्राइव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसले होते. गाडी त्यांच्या पत्नी अनाहिता चालवत होत्या.अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर वापी येथील रेनबो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात एअरलिफ्ट करून आणलं जाणार आहे. त्यांचे घरगुती संबंध असलेले प्रसिद्ध सर्जन डॉक्टर मेहली नजीर त्यांच्यावर ट्रीटमेंट करणार आहेत, अशी बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे.
जहांगीर पंडोले