रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ६ तासांनी पूर्ववत
गेल्या ६ तासांपासून ठप्प असलेली मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता हळुहळु सुरु झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यात आलेला मातीचा ढीग आणि दरड बाजूला हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. पोकलेनने ही दरड आणि माती दूर करण्यात आली असून घाटातून वाहतूक हळुहळु पुढे सोडण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे. परशुराम घाटात गेल्या काही […]
ADVERTISEMENT

गेल्या ६ तासांपासून ठप्प असलेली मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता हळुहळु सुरु झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यात आलेला मातीचा ढीग आणि दरड बाजूला हटवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. पोकलेनने ही दरड आणि माती दूर करण्यात आली असून घाटातून वाहतूक हळुहळु पुढे सोडण्यात येत आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे. परशुराम घाटात गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचं काम सुरू आहे. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास दरड फोडण्याचं काम सुरू असताना अचानक दरड कोसळली, यामध्ये २ जेसीबी दरडीखाली गेले. या दुर्घटनेत एका जेसीबी चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.