चांदणी चौक मंगळवारी रात्री पुन्हा बंद राहणार : मुंबईहून साताऱ्याला जाणारी वाहतूक वळवली
पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर आता तिथे लेन वाढविण्यासाठी लगतचे खडक फोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी सोमवारी दुपारी पाऊण तासांसाठी वाहतूक थांबवली होती. त्यानंतर आज (4 ऑक्टोबर) रात्री साडे अकरा ते (5 ऑक्टोबर) बुधवार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक 2 तासांसाठी बंद राहणार आहे. मुंबई ते सातारा […]
ADVERTISEMENT

पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर आता तिथे लेन वाढविण्यासाठी लगतचे खडक फोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी सोमवारी दुपारी पाऊण तासांसाठी वाहतूक थांबवली होती. त्यानंतर आज (4 ऑक्टोबर) रात्री साडे अकरा ते (5 ऑक्टोबर) बुधवार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक 2 तासांसाठी बंद राहणार आहे.
मुंबई ते सातारा लेन बंद राहणार :
इथला खडक फोडण्यासाठी 16 ठिकाणी छिद्र घेऊन हा स्फोट करण्यात येणार आहे. यावेळी साताऱ्याहुन मुंबईकडे जाणारी वाहतूकही दहा ते पंधरा मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच या मार्गाची वाहतुक सुरु होणार आहे.
मुंबईहुन साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गवरील वाहतूक प्रामुख्याने बंद राहणार आहे. ही वाहतूक राडारोडा हटविल्यानंतर रात्री दीडनंतर सुरू होणार आहे. यादरम्यान, ही वाहतूक वाकडमार्गे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे वाहतूक पोलीस उपायु्क्त आनंद भोईटे यांनी दिली. येथून शिवाजीनगर, कात्रजमार्गे पुढे जाता येईल.
ऐन सणाच्या काळात प्रवाशांना मनस्ताप :
चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम ऐन सणाच्या काळात सुरु केल्याने मोठ्या प्रमाणावर मनस्ताप असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. आधीच प्रचंड वाहतूक कोंडी, त्यात 2 ऑक्टोबरला मध्यरात्री पूल पाडण्यासाठी, त्यानंतर 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी लगतचा खडक फोडण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन सणाच्या दिवसांमध्ये प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.