ठाकरे सरकार मला ‘नारायण भंडारी’सारखं वाटतं असं का म्हणाले फडणवीस?

मुंबई तक

आज देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचार, पूजा चव्हाण प्रकरण, शेतकरी वीज बिल तोडण्या या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी घेणंदेणं नसल्याचीही टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी नारायण भंडारीची गोष्ट सांगत ठाकरे सरकारवर टीका केली. मला ठाकरे सरकारचा कारभार हा नारायण भंडारीसारखा वाटतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आज देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचार, पूजा चव्हाण प्रकरण, शेतकरी वीज बिल तोडण्या या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी घेणंदेणं नसल्याचीही टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी नारायण भंडारीची गोष्ट सांगत ठाकरे सरकारवर टीका केली. मला ठाकरे सरकारचा कारभार हा नारायण भंडारीसारखा वाटतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊ.

ही बातमी वाचलीत का? नाईटलाईफ आणि कोरोनावरून देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

एकदा एका शाळेत वर्गाचा मॉनिटर निवडायचा होता. मॉनिटरच्या निवडीसाठी मास्तर आले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं की तू शाळा सुटल्यावर काय करतोस? त्याने उत्तर दिलं की, मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि पप्पांसाठी भांगेची गोळी घेऊन येतो. मग दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं की तू शाळा सुटल्यावर काय करतोस? तर तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि वडिलांसाठी हातभट्टीचा खंबा घेऊन जातो. मग तिसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तू शाळा सुटल्यावर काय करतोस? तो म्हणाला मी नारायण भंडारीच्या घरी जातो आणि बाबांच्या चिलमीत गांजा भरून आणतो. यानंतर ते मास्तर प्रचंड नाराज झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp