मुंबई पोलिसांमधील नाराजी चव्हाट्यावर ! उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले संजय पांडे सुट्टीवर

सौरभ वक्तानिया

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे. सचिन वाझे प्रकरणाच चर्चेत आलेल्या परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागात बदली करण्यात आली आहे. परंतू या प्रकरणात राज्य सरकारसमोरच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेले IPS अधिकारी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे. सचिन वाझे प्रकरणाच चर्चेत आलेल्या परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागात बदली करण्यात आली आहे. परंतू या प्रकरणात राज्य सरकारसमोरच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेले IPS अधिकारी संजय पांडे सुट्टीवर गेले आहेत. परमबीर सिंग यांच्याआधी संजय पांडे यांच्याकडे होमगार्ड विभागाच्या DG पदाचा पदभार होता. नवीन बदल्यांमध्ये पांडे यांना Maharashtra State Security Corporation विभागात हलवण्यात आलं. महत्वाच्या पदांसाठी आपला विचार केला जात नसल्यामुळे नाराज झालेल्या पांडे यांनी सुट्टीवर जाणं पसंत केलं आहे. संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्यावर अन्याय होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम करत असताना माझी कारकिर्द ठप्प राहिलं याची जाणीवपूर्वक काळजी घेतली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर हा अन्याय होत आहे. परंतू नुकत्याच घडलेल्या घटनांनंतर या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण गरजेचं आहे. तुमच्या कारकिर्दीत माझ्यावर झालेला अन्याय दूर करण्याची तुमच्याकडे संधी होती पण तुम्ही वारंवार या संधीकडे दुर्लक्ष केलंत असा आरोप संजय पांडे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

मुंबई पोलिसांना मिळाले नवे बॉस, जाणून घ्या कोण आहेत हेमंत नगराळे?

Anti Corruption DG, Mumbai Police CP या प्रत्येक महत्वाच्या पोजिशनसाठी आपल्याला डावलण्यात आल्याचं पांडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. “सुबोध जैस्वाल DGP पदावरुन निवृत्त झाल्यानंतर तुम्ही माझा या पदासाठी विचारही केला नाहीत. या पदाचा अतिरीक्त पदभार माझ्याकडे द्यायचं सोडा ही पोस्ट तुम्ही ज्युनिअर ऑफिसरला दिलीत. मुंबईत स्फोटकं सापडल्यानंतरही माझ्या बाबतीत हाच प्रकार पुन्हा एकदा झाला आणि DGP पदाचा अतिरीक्त पदभार तुम्ही ज्युनिअर ऑफिसरकडे दिलात. सध्याच्या घडीला मी ज्येष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक असलो तरीही DG दर्जाच्या पोस्टींगसाठी माझा विचार न करता ज्युनिअर लेव्हलच्या अधिकाऱ्याला याचा पदभार सोपवला जातो हे माझ्यासाठी अत्यंत अपमानजनक आहे.”

हे वाचलं का?

    follow whatsapp