मुस्लिम जोडप्याने शंकराच्या मंदिरात घेतले 7 फेरे, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न

पुजाऱ्यांच्या साक्षीनं या जोडप्याने महादेव मंदिरात सात फेरे घेतले.
मुस्लिम जोडप्याने शंकराच्या मंदिरात घेतले 7 फेरे, हिंदू रितीरिवाजांनुसार केलं लग्न

भारत फिरायला आलेले एक अमेरिकन मुस्लिम जोडपे हिंदू संस्कृतीशी इतके जोडले गेले की त्यांनी मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुजाऱ्यांच्या साक्षीनं या जोडप्याने महादेव मंदिरात सात फेरे घेतले. लग्नानंतर कियामह म्हणाली की मला वाटतं हिंदू धर्म मनःशांती देऊ शकतो.

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील त्रिलोचन महादेव मंदिरात हा विवाह पार पडला. कियामह दिन खलिफा आणि केशा खलिफा हे अमेरिकन वंशाचे मुस्लिम जोडपे भारत भेटीसाठी आले होते. या दरम्यान मुस्लिम जोडप्याला हिंदू संस्कृती इतकी आवडली की दोघांनीही हिंदू रितीरिवाजानुसार बाबा भोलेनाथांना साक्षी मानून त्रिलोचन महादेवाच्या मंदिरात लग्न केले. मात्र, त्याअगोदरही दोघांनी लग्न केलेले होते.

मंदिराचे पुजारी रविशंकर गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचे वय 40 ते 45 दरम्यान आहे. पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याचे आधीच लग्न झालेले आहे. खालिदने सांगितले की तो 9 मुलांचा बाप आहे. त्याच वेळी, पत्नी केशा खलिफाच्या मते, तिचे आजोबा भारतीय वंशाचे हिंदू आहेत. अमेरिकन मुस्लिम जोडप्याने हिंदू परंपरेनुसार लग्न केल्याच्या घटनेची आजूबाजूच्या परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

'आमचा थेट देवाशी नातं आहे'

हिंदू रितीरिवाजांनी लग्न करण्याबाबत कियामह म्हणाला माझ्या आयुष्यातून काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. मला देवाशी एक नातं जोडायचं होतं. हिंदू धर्माचे पालन करून, आपण स्वतःशी चांगले संबंध विकसित करू शकतो. त्यामुळे मी देवासोबतही चांगला संबंध विकसित करू शकतो. मला वाटते की हिंदू धर्म मला मनःशांती देऊ शकतो.

कियामह आपल्या पत्नीसोबत भारतातील विविध ठिकाणांना भेट देत होता. वाराणसीतील घाट, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांना भेटी देताना दोघेही हिंदू संस्कृतीशी इतके जोडले गेले की त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला.

जौनपूर जिल्ह्यातील त्रिलोचन महादेव मंदिरात शनिवारी हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांचा विवाह झाला. अमेरिकेहून आलेल्या या मुस्लीम जोडप्याने हिंदू रितीरिवाजांनुसार मंदिरात सात फेरे घेतले. नंतर मंत्रोच्चारासह खलिफाने केशाला सिंदूरही लावले.

पासपोर्ट आणि व्हिसा सोबत न आणल्यामुळे या जोडप्याला नोंदणी प्रमाणपत्र न घेता लग्नानंतर लगेच परतावे लागले. त्यानंतर रविवारी मुस्लिम दाम्पत्याने आवश्यक कागदपत्रे देऊन प्रमाणपत्र काढून घेतले. कियामह आणि केशासोबत आलेल्या पंडित गोविंद शास्त्री यांनी सांगितले की, लग्नाचे सर्व विधी हिंदू रितीरिवाजांनुसार पूर्ण झाले आणि त्यानंतर ते दोघे निघून गेले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in