वसई : प्रेमभंग झालेल्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसईत एका तरूणाने प्रेमभंग झाल्याने चक्क एका टेकडीवर चढून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतू वालीव पोलिसांनी तरूणाला बोलण्यात गूंतवून त्याला वेळीच ताब्यात घेतल्याने त्याचा जीव वाचला आहे. दोन पोलिसांनी त्याला फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवून टेकडीच्या तब्बल २०० पायऱ्या चढत जाऊन तरुणाला वाचवले. पोलिसांचा या कृतीचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाची वसईत कंपनी आहे. वसईत राहणाऱ्या एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. परंतू टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने लग्न केल्यामुळे हा तरुण निराश झाला. शनिवारी सकाळी आत्महत्या करण्यासाठी या तरुणाने थेट वसई पूर्व भागातली भागवत टेकडी गाठली. ही माहीती अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच सकाळी सव्वा अकरा वाजता वालीव पोलिसांना कळवले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन पोलिस बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. हा तरुण ज्या टेकडीवर होता ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती.

बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोन वर बोलण्यात गुंगवून ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यपासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात ५ मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गॅसचा पाईप पत्नीच्या तोंडात टाकून हत्या, आरोपी पतीला मध्य प्रदेशातून अटक

    follow whatsapp

    ADVERTISEMENT