VIDEO: कसब्याचा निकाल लागताच अजित पवारांनी केली CM शिंदेंची नक्कल
Ajit Pawar mimicked Chief Minister Shinde: मुंबई: कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election) बलाढ्य भाजपचे उमेदवार (BJP) हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) पराभव केला केल्या राज्यातील विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याचविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचीच नक्कल (Mimicry) केली आहे. (video ajit […]
ADVERTISEMENT

Ajit Pawar mimicked Chief Minister Shinde: मुंबई: कसबा पोटनिवडणुकीत (Kasba by-election) बलाढ्य भाजपचे उमेदवार (BJP) हेमंत रासनेंचा (Hemant Rasane) पराभव केला केल्या राज्यातील विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. याचविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचीच नक्कल (Mimicry) केली आहे. (video ajit pawar mimicked cm eknath shinde as soon as kasba by election results were announced)
‘मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी सर्वसामान्यांना भेटणार.. पण सर्वसामान्यांना भेटून पण सर्वसामान्यांनीच पराभव केला…’ अशी नक्कल अजित पवार यांनी यावेळी केली.
पाहा अजित पवार नेमकी कशी केली CM शिंदेंची मिमिक्री
‘शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाचा हा 100 टक्के पराभव आहे. त्या दोघांनीच तिथे बस्तान टाकलं होतं.. ते दोघंच तिथे ठासून बसलेले होते. मी म्हटलं की, अहो राज्याचे मुख्यमंत्री कधी रोड शो घेतात का? तर त्यांनी मला ऐकवलं..’
म्हणाले, (एकनाथ शिंदेंची नक्कल करत) ‘मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मी सर्वसामान्यांना भेटणार.. पण सर्वसामान्यांना भेटून पण सर्वसामान्यांनीच पराभव केला… आता हे लक्षात घ्या.. हा..’
Narayan Rane: ‘अजित पवार पुण्याला येऊन बारा वाजवीन मी’, ‘त्या’ विधानावरुन राणे संतापले