Manoj Jarange : ''फडणवीसांसकडून सुपारी घेऊन मराठ्यांना कापण्याची...'', जरांगेंचा राजेंद्र राऊतांवर पलटवार

मुंबई तक

मनोज जरांगेंनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना लुंगे-सुंगे लय बघितले म्हणत पलटवार केलाय. तसेच देवेंद्र फडणवीसांवरही आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

google news

Manoj Jarange News : मनोज जरांगेंनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना लुंगे-सुंगे लय बघितले म्हणत पलटवार केलाय. त्यांनी देवेंद्र फडणवीसांसकडून सुपारी घेऊन मराठ्यांना कापण्याची भाषा करतो असे आरोप केले आहेत. बार्शीतही घोंगडी बैठक होणार, बघू कोण गोंधळ घालतो म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी खुल आव्हान दिलंय.

मनोज जरांगेंनी डोकं फिरवू नये, खंडोजी खोपडेच्या भूमिकेत बार्शीत आलात तर याचा काय परिणाम होईल याची महाराष्ट्र नोंद घेईल असा इशाराही आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला. बार्शीचा आमदार संडासलाग्या म्हणत आमदार राजा राऊतांना मनोज जरांगेंनी लक्ष्य केले आहे. त्यानंतर राजा राऊतांनी मनोज जरांगेंवर थेट हल्लाबोल केला होता. त्यावर मनोज जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.