पंढरपूर : रोहित पवारांचं 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' आंदोलन, शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे का?
रोहित पवारांचं शेतकऱ्यांसाठी पंढरपुरात आंदोलन पार पडणार आहे. अन्नदात्यासाठी अन्नत्याग या आंदोलनावरुन शेतकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. रोहित पवार यांच्या मागण्यांबाबत शेतकरी सकारात्मक आहेत का? जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
Rohit Pawar Farmer Protest Pandharpur : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपूर येथे 'अन्नदात्यासाठी अन्नत्याग' हे महत्त्वपूर्ण आंदोलन पार पडणार आहे. राज्य सरकारने नुकतीच शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असली, तरी त्यातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळावा, यासाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे.
या आंदोलनाच्या मुख्य मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणे, 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या अटींसह कर्जमाफी लागू करणे आणि शेतकरी विरोधी जाचक अटी रद्द करून 1 रुपयात पीकविमा योजना पुन्हा प्रभावीपणे लागू करणे यांचा समावेश आहे. या मागण्यांच्या समर्थनार्थ आता प्रत्यक्ष शेतकरी वर्गही पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे. रोहित पवारांच्या या मागण्यांबाबत शेतकरी सकारात्मक आहेत का हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी.









