Kalicharan: कालीचरण महाराजांचं अत्यंत वादग्रस्त भाषण, नवा Video व्हायरल
मिथिलेश गुप्ता, कल्याण: महात्मा गांधींना शिवीगाळ करत नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या कालीचरण महाराज यांना अखेर छत्तीसगडच्या पोलिसांनी अटक केली आहे. पण आता यानंतर कालीचरण महाराजांचा आणखी एक व्हीडिओ आता समोर आला आहे. समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं केल्यामुळे कालीचरण महाराज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. कल्याणमधील एका कार्यक्रमासाठी आलेल्या कालीचरण महाराज यांनी दिलेलं भाषण […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, कल्याण: महात्मा गांधींना शिवीगाळ करत नथुराम गोडसेचा जयजयकार करणाऱ्या कालीचरण महाराज यांना अखेर छत्तीसगडच्या पोलिसांनी अटक केली आहे. पण आता यानंतर कालीचरण महाराजांचा आणखी एक व्हीडिओ आता समोर आला आहे. समाजात तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणं केल्यामुळे कालीचरण महाराज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
कल्याणमधील एका कार्यक्रमासाठी आलेल्या कालीचरण महाराज यांनी दिलेलं भाषण आता व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी आणि पंडित नेहरुंबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
10 डिसेंबर रोजी कल्याणच्या सकेत कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात महात्मा गांधी व पंडित नेहरूंबद्दल अपशब्द तसेच दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे विधान केलं आहे. या कार्यक्रमाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून कालीचरण महाराज यांच्यावर कल्याणमध्येही गुन्हा दाखल होईल का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच कार्यक्रमात पोलिसांचे आदेश डावलून त्यासोबत आपत्ती व्यवस्थापन, साथ रोग कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून कोळसेवाडी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता.
कालीचरण यांचं कल्याणमधील वादग्रस्त भाषण