हात पसरून कुणाकडे पद मागावं असे आमचे संस्कार नाहीत, पंकजा मुंडे यांची नाराजी पुन्हा समोर
जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड या ठिकाणी माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे आल्या होत्या. या कार्यक्रमात बोलत असताना त्यांच्या मनातली खदखद पुन्हा समोर आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी टोला लगावला आहे. त्यावरून त्यांच्या मनातली पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? ‘माझं विश्व […]
ADVERTISEMENT

जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड या ठिकाणी माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे आल्या होत्या. या कार्यक्रमात बोलत असताना त्यांच्या मनातली खदखद पुन्हा समोर आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी टोला लगावला आहे. त्यावरून त्यांच्या मनातली पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
‘माझं विश्व माझे माता-पिता आहेत. माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला मी दहा परिक्रमा करेन अजून कुठल्या परिक्रमेची मला आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून मी नतमस्तक होईन पण कुठल्याही पदासाठी कुणापुढे हात पसरण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत. एखादी संधी मिळाली नाही तर नाही. पण त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी काम करण्याची संधी मात्र कधीही सोडणार नाही. गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार माझ्यावर आहेत मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.’