Rakesh Jhunjhunwala Death: पंतप्रधानांपासून ते गौतम अदानींपर्यंत काय म्हणाले दिग्गज?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झालं. दलाल स्ट्रीटचे बिग बुल म्हणून झुनझुनवालांना ओळखले जात होते. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गौतम अदानींपर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी झुनझुनवाला यांना श्रंद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी वाहिली श्रद्धांजली

राकेश झुनझुनवाला न नमणारे व्यक्तिमत्व होते. त्यांचे संपूर्ण जीवन विनोदी आणि अंतर्दृष्टी असलेले होते, त्यांनी आर्थिक जगामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्सुक होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या प्रति माझ्या संवेदना. ओम शांती. अशा आशयाचं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Rakesh Jhunjhunwala: यशस्वी गुंतवणूकदार बनण्यासाठी राकेश झुनझुनवालांचे 11 वन-लाइनर्स

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कधीही भरून न येणारे नुकसान- एन चंद्रशेखरन

राकेश झुनझुनवाला यांचे जाणे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. भारतीय शेअर मार्केटमधील वॉरन बफे आणि ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे अब्जाधीश गुंतवणूकदारांचे रविवारी सकाळी ६:४५ वाजता निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांचा भारताच्या विकासकथेवर विश्वास होता, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले.

“राकेश झुनझुनवाला यांचा भारतावर आणि देशाच्या पूर्ण क्षमतेवर विश्वास होता. या खात्रीमुळे त्यांनी आयुष्यभर आणि कारकीर्दीत सातत्याने धाडसी निर्णय घेतले. त्यांना टाटा समूहाबद्दल प्रचंड आदर होता. झुनझुनवाला यांचे निधन हे एक कधीही भरून न येणारे नुकसान आहे आणि आम्ही त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो असेही एन चंद्रशेखरन म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

आपल्या ट्विटमध्ये काय म्हणाले गौतम अदानी

“भारतातील सर्वात दिग्गज गुंतवणूकदाराच्या अकाली निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. श्री झुनझुनवाला यांनी आपल्या उत्कृष्ट विचारांनी एका संपूर्ण पिढीला आपल्या इक्विटी मार्केटवर विश्वास ठेवण्यास प्रेरित केले. आम्ही त्यांनी मिस करू. भारताला त्यांची उणीव भासेल पण आपण त्यांना कधीच विसरणार नाही. RIP,” असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ADVERTISEMENT

पियूष गोयल काय म्हणाले?

“दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने खूप दुःख झाले. करोडोच्या संपत्ती निर्मितीसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि प्रशंसक यांच्याबद्दल माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती.” असे ट्विट केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची श्रद्धांजली

“श्री राकेश झुनझुनवाला आपल्यात राहिले नाहीत. गुंतवणूकदार, धाडसी जोखीम घेणारा, शेअर बाजाराची निपुण समज, संवादात स्पष्ट, ते स्वत: एक नेते होते. आमच्यात झालेली अनेक संभाषणे मनापासून लक्षात राहतील. भारताच्या सामर्थ्यावर आणि क्षमतेवर त्यांचा दृढ विश्वास होता. शोकसंवेदना”. अशा आशयाचं ट्विट निर्मला सितारामन यांनी केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT