वाझेंना अटक करणारी NIA संस्था नेमकी आहे तरी काय, कशी झाली स्थापना?
मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सचिन वाझेंची कसून चौकशी केल्यानंतर NIA ने त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाझेंच्या अटकेनंतर NIA बाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे. NIA ही संस्था नेमकी आहे तरी काय याविषयी आता अनेक जण जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता याचविषयी आम्ही […]
ADVERTISEMENT

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. सचिन वाझेंची कसून चौकशी केल्यानंतर NIA ने त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वाझेंच्या अटकेनंतर NIA बाबत बरीच चर्चा सुरु झाली आहे.
NIA ही संस्था नेमकी आहे तरी काय याविषयी आता अनेक जण जाणून घेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता याचविषयी आम्ही आपल्या सविस्तरपणे माहिती देणार आहोत.
‘या’ घटनेनंतर NIA ची झाली स्थापना
26/11चा मुंबई हल्ला ही सगळ्याच भारतीयांची एक दुखरी बाजू. हा हल्ला जेव्हा झाला तेव्हा भारतीय गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश मानलं गेलं आणि केंद्रीय पातळीवर दहशतवाद संबंधी प्रकरणांची चौकशी करणारी एक स्वायत्त संस्था असावी या उद्देशाने राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ची स्थापना करण्यात आली. तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी NIA ची स्थापना केली होती.