नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?

Navneet Rana, Ravi Rana : नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध १२४ अ कलम लावण्यात आलं...
नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाच्या समोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणणार असं आव्हान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) या दोघांनी दिलं होतं. त्यानंतर झालेला राडा महाराष्ट्राने पाहिलाच. अखेर या दोघांनी आपलं आव्हान मागे घेतलं. मात्र जो काही राडा झाला आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. नंतर झालेल्या सुनावणी वेळी त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचं कलमही (IPC 124 a) लावण्यात आलं. त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. राजद्रोहाचा गुन्हा म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेणार आहोत.

नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?
रवी राणा आणि नवनीत राणा मुंबईत आल्यापासून काय काय घडलं?

राजद्रोहाचा गुन्हा म्हणजे काय?

इंडियन पीनल कोडचं सेक्शन 124 अ राजद्रोहसंदर्भात आहे. याचा सोप्पा अर्थ एखादी व्यक्ती सरकारविरोधात जर काही बोलत असेल, सरकारविरोधी गोष्टींचं समर्थन करत असेल. राष्ट्रीय चिन्हांचा अवमान केला, संविधानाला कमी लेखलं तर अशा व्यक्तीविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. याच घटनांना जर कोणी समर्थन देत असेल तर त्याच्यावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.

बोललेले किंवा लिहिलेले शब्द, कोणतेही संकेतांद्वारे घृणा किंवा अवमान होत असल्याची भावना उत्तेजित करत असेल किंवा सरकारविरोधात असंतोष भडकावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला राजद्रोह म्हणतात. राजद्रोह लागल्यास 3 वर्षांच्या शिक्षेपासून आजीवन तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. हा अजामीनपात्र गुन्हा आहे. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो.

रवी राणा यांचे मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप
रवी राणा यांचे मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप (फोटो सौजन्य - Twitter)

आता बोललेले किंवा लिहिलेले शब्द यात शब्दांचे अर्थ नेमके काय काढायचे, तर याबाबतही सुप्रीम कोर्टाने त्याची व्याख्या सांगितली आहे. भारतात लोकशाही आहे, त्यामुळे सरकारविरोधात आपण बोलू शकतो, सरकारविरोधात बोलल्याने राजद्रोह लागत नाही. पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या व्याख्येनुसार असे शब्द किंवा कृती ज्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडेल, किंवा ज्यामुळे हिंसाचार होईल, असे शब्द किंवा कृती केल्यास राजद्रोह लागू शकतो.

राजद्रोहाचे आरोप अनेकदा लावण्यात आले, पण सिद्ध किती झाले? नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवर नजर टाकूयात.

गेल्या काही वर्षांमध्ये किती गुन्हे दाखल झाले आहेत?

वर्ष गुन्हे दोषी

2015 30 0

2016 35 01

2017 51 04

2018 70 02

2019 93 02 (29 निर्दोष )

2019 मध्ये संसदेतच गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे कलम हटवण्यासंदर्भात कोणतंही कलम नाहीये. 2020 मध्ये मुंबई पोलिसांनी कंगना राणावतवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला, कंगना सातत्याने 2 समाजांमध्ये तेढ निर्माण करेल असे ट्विट्स करत होती. ठाकरे सरकारचा बाबर सेना असा उल्लेखही तिच्या ट्विट्समध्ये होता. त्याच्यासोबतच पालघरमधील साधूंवरील हल्ल्यावरूनही तिचे वादग्रस्त ट्विट्स होते, ज्यावरून तिच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला. मात्र यावर जेव्हा मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली, तेव्हा कोर्टाने थेट प्रश्नच विचारला, की राजद्रोहाचे गुन्हे दाखल करणे हे आता काही रूटीन राहिलंय का?

2020 मध्येच LGBTQ रॅलीमध्ये काही CAA आणि NRC वरून घोषणा दिल्या म्हणून राजद्रोहाचे गुन्हा 22 वर्षीय व्यक्तीवर लावण्यात आला, तेव्हाही हायकोर्टाने म्हटलेलं की निव्वळ घोषणा दिल्या म्हणून राजद्रोह लावता येऊ शकत नाही.

नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?
Navneet Rana Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात काय घडलं?

हायकोर्टाने 2015 मध्ये एक निरीक्षण नोंदवलेलं ज्याच्याकडे मला तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय. एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टाने म्हटलेलं की, जोवर हिंसाचार किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत नाही तोवर सरकारविरोधात केलेल्या टीकेवर राजद्रोहासारखे गुन्हे दाखल करता येऊ शकत नाहीत. 2012 मध्ये असीम त्रिवेदी यांनी काढलेल्या कार्टूनद्वारे भारताचे नॅशनल सिंबल्स आहेत, त्याचा अवमान झाल्याप्रकरणी दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावरील PILवर ही सुनावणी हायकोर्टात झालेली.

15 जुलै 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेही म्हटलेलं की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही राजद्रोहासारख्या कायद्याची गरज आहे? ब्रिटिशांनी लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणलेला हा कायदा होता, ज्याचा वापर लोकमान्य टिळक, महात्मा गांधींविरोधातही करण्यात आला, अशा कायद्याला रद्द का नाही सरकार करत? असाही प्रश्न विचारला गेला होता. आता हेच राजद्रोहाचं कलम राणा दाम्पत्याच्या विरोधात लावण्यात आलं आहे. त्यांना कोर्टानेही चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

पाहा व्हीडिओ

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in