What is Masked Aadhaar? आधार कार्डच्या फ्रॉडपासून वाचण्याचे उपाय काय आहेत?

जाणून घ्या केंद्र सरकारने काय म्हटलं आहे आधार कार्डबाबत ?
What is Masked Aadhaar? आधार कार्डच्या फ्रॉडपासून वाचण्याचे उपाय काय आहेत?
What is Masked Aadhaar?Masked Aadhaar make your Aadhaar more secure

Masked Aadhaar Card : आधार कार्ड हा आपल्या सगळ्यांच्याच ओळखीसाठीचा एक महत्त्वाचा आणि अविभाज्य किंवा अनिवार्य झालेला हा घटक आहे. मात्र या आधार कार्डचा फ्रॉडही होऊ शकतो. जर आधार कार्ड देत असताना थोडासा निष्काळजीपणा केला गेला तर हे शक्य आहे. त्यामुळेच आधार कार्ड बाबत केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स आणल्या आहेत. एवढंच नाही तर लोकांनी फक्त मास्क्ड आधार कार्ड शेअर करावं असंही म्हटलं आहे. आता हे मास्क्ड आधार कार्ड म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेणार आहोत.

आधार कार्डचा चुकीचा उपयोग होऊ शकतो असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे कुठल्याही संस्थेला तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी देऊ नका. त्याऐवजी मास्क्ड आधार कार्डचा उपयोग करा असं केंद्राने सुचवलं आहे.

Masked Aadhaar Card म्हणजे नेमकं काय?

मास्क्ड आधार कार्डमध्ये तुमच्या आधारचा १२ अंकांचा पूर्ण नंबर दिसत नाही. फक्त शेवटचे चार अंक दिसतात. हे मास्क्ड आधार कार्ड तुम्ही ऑनलाईनही काढू शकता. हॉटेल किंवा सिनेमा हॉल यांसारख्या विना परवाना खासगी संस्थांना आधार कार्डची कॉपी ठेवता येत नाही. आधार अधिनियम २०१६ नुसार हा गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाच्या अॅडव्होकेट अश्विनी दुबे यांनी म्हटलं आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या नोटीसमध्ये हे म्हटलं आहे की परवाना नसलेल्या खासगी संस्थाना आधार घेण्याचा अधिकार नाही. ते तुमचं आधार स्वतःकडे ठेवू शकत नाही. परवाना नसलेली हॉटेल्स आणि सिनेमा हॉल्स यामध्ये तुमचं आधार देऊही नका. फक्त अशा खासगी संस्थाच तुमचं आधार कार्ड किंवा त्याची कॉपी मागू शकतात ज्यांच्या UIDAI चं युझर लायसन्स आहे.

Masked Aadhaar make your Aadhaar more secure
Masked Aadhaar make your Aadhaar more secure

सरकारने आधार कार्ड विषयी आणखी काय म्हटलं आहे?

सरकारने सर्व नागरिकांना हा इशारा दिला आहे की तुमच्या आधार कार्डची कॉपी तुम्ही कोणत्याही पब्लिक कॉम्प्युटर किंवा सायबर कॅफेतून डाऊनलोड करू नका. जर तुम्ही असं केलंत तर याची खात्री करून घ्या की समोरच्या व्यक्तीने तुमची डाऊनलोड केलेली कॉपी ही डिलिट केली आहे. आधार कार्ड हे भारतातल्या नागरिकाचं ओळखपत्र आहे. हा एक १२ डिजिटचा नंबर असतो त्याला आधार क्रमांक म्हटलं जातं. आधार कार्ड तुमची बायोमॅट्रिक ओळख निश्चित करतं. भारत सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचं ठरतं. एवढंच नाही तर आधारच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल पेमेंटही करू शकता.

Masked Aadhaar make your Aadhaar more secure
Masked Aadhaar make your Aadhaar more secure

मास्क्ड आधार डाऊनलोड कसं कराल?

मास्क्ड आधार डाऊनलोड करायचं असेल तर तुम्ही UIDAI च्या वेबसाईटवर जा, तिथे Do You Want a Masked Aadhaar चा पर्याय निवडा. त्या ठिकाणी योग्य ते सगळे तपशील भरा. ज्यानंतर तुम्ही तुमचं मास्क्ड आधार डाऊनलोड करू शकता.

आधार्ड कार्ड ऑनलाइन डाऊनलोड कसं कराल?

UIDAI ने स्मार्ट फोन युजर्ससाठी mAadhaar हे अॅप आणलं आहे. हे अॅप तुम्ही तुमच्या अँड्रॉईड फोनच्या प्ले स्टोअरमधून आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे अॅप अत्यंत सुरक्षित आहे. तसंच तुम्ही जर तुमचा फोन बदलला तर ते अॅप तुमच्या नव्या मोबाईलवर अॅक्टिव्ह होतं. हे अॅप एका वेळी एकाच मोबाईलवर अॅक्टिव्ह होत असल्याने तुम्ही जर फोन बदलला तरीही ते जुन्या मोबाईलवर डिअॅक्टिव्हेट करता येतं. तसंच या अॅपला चार अंकाचा कोड देण्यात आला आहे. त्यामुळे तो माहित नसेल तर तुमच्या आधारचे तपशील हे कुणालाही कळू शकत नाहीत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in