काय आहे ‘वन नेशन-वन हेल्थ कार्ड’?: सर्वसामान्यांना काय होणार फायदा?
केंद्र सरकारच्या ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’, ‘वन नेशन-वन टॅक्स’ या योजनांची नावं तुम्ही ऐकली असतील. आता केंद्र सरकारने देशातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अशीच एक योजना सुरू केली आहे. योजनेचं नाव आहे राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! ((National Digital Health Mission-NDHM) याच योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑग्सट […]
ADVERTISEMENT

केंद्र सरकारच्या ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’, ‘वन नेशन-वन टॅक्स’ या योजनांची नावं तुम्ही ऐकली असतील. आता केंद्र सरकारने देशातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अशीच एक योजना सुरू केली आहे. योजनेचं नाव आहे राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! ((National Digital Health Mission-NDHM) याच योजनेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑग्सट २०२० रोजी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली होती. सध्या ही योजना देशातील अंदमान-निकोबार, चंदीगढ, दादरा व नगर हवेली, दमण-दीव, लडाख आणि लक्षद्वीप या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट स्वरूपात राबवली जात आहेत.
काय आहे नॅशनल हेल्थ मिशन?
केंद्र सरकारने देशात एकात्मिक संगणकीकृत आरोग्य सुविधा तयार करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांकडे यूनिक हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची (आजार व उपचार, शारीरिक व्याधी आणि उपचार आदी) संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.