Share Market : शेअर मार्केट सध्या तेजीत आहे, त्यानिमित्ताने जाणून घ्या काय असतं शेअर मार्केट, सेन्सेक्स आणि निफ्टी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सेन्सक्सने आज ऐतिहासिक उसळी घेतली, निफ्टी आपटला, शेअर मार्केटमध्ये तेजी, अशा हेडलाईन्स, बातम्या, चर्चा तुम्ही अनेकदा ऐकत असाल, पण प्रत्येकालाच यातलं खोलात ज्ञान असेल असं नाही. अनेक जण तर पेपरमधला बिझनेस पेजपर्यंत जातच नाहीत, किंवा ते बाजुला सारून पुढे जातात. तसा पैसा तर सगळ्यांच्या कामाचा आहे, आज-कालच्या जमान्यात तर कोण म्हणणार नाही की मला पैशांची गरज नाही. मग पैशांवरून चालणाऱ्या शेअर बाजारची माहिती घेण्यात तरी मागे का राहायचं? त्यामुळेच सेन्सेक्स-निफ्टी वधारला आणि आपटला ह्या गोष्टी फक्त दररोज ऐकण्यापेक्षा आज त्यांची माहिती थोडक्यात समजून घेऊयात.

Hindi Din : हिंदी भारताची राष्ट्रभाषा का नाही? समजून घ्या

तीन प्रमुख गोष्टी ज्या आपण समजून घेऊ…शेअर बाजार म्हणजे काय? सेन्सेक्स आणि ऩिफ्टी म्हणजे काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1. शेअर मार्केट- शेअर्स म्हणजे हिस्सा…शेअर बाजार म्हणजे याच हिस्सेदारांचा बाजार. ज्या लिस्टेड कंपन्या असतात त्यांची संपत्ती आणि मालकी हक्क हिस्स्यांमध्ये विभागलेला असतो.

तुमच्याकडे शेअर्स आहेत, म्हणजे तुम्हीही त्या कंपनीच्या संपत्ती-मालकीमधले हिस्सेदार आहात.

ADVERTISEMENT

तुम्ही शेअर्स घेतलेत म्हणजे त्या कंपनीच्या नफ्याचे तुम्ही लाभार्थीही असता आणि तोटा झाला तर त्याचा भुर्दंडही तुम्हाला बसू शकतो. तुम्ही किती शेअर्स घेतलेत यावरून तुम्हाला त्या कंपनीच्या किती नफा होणार आहे किती तोटा होणार हे ठरतं.

ADVERTISEMENT

आपल्या देशात 2 महत्वाचे शेअर बाजार आहेत. एक BSE- Bombay Stock Exchange आणि दुसरा महत्वाचा NSE- National Stock Exchange. हे दोन स्टॉक एक्स्जेंच जगातील 10 टॉप एक्स्चेंजमध्ये आहेत. भारतात या दोन व्यतिरिक्त आणखीही स्टॉक एक्स्चेंज आहेत, जसं की कोलकाता, अहमदाबाद वगैरे. शेअर मार्केटचा उल्लेख करताच कायम बातम्यांमध्ये तुम्ही जी इमारत पाहता ती Bombay stock exchange ची आहे. 1986 मध्ये BSE ची स्थापना झाली.

आता BSE-NSE काय आहे?, तर एका भाजी मार्केटचा विचार करा. मार्केटमध्ये व्यापारी भाजी घेऊन येतो, तसं शेअर बाजारात कंपन्या आपल्या कंपनीचे शेअर्स विकायला घेऊन येतात. तुम्ही मार्केटमधून भाजी घेऊन जाता, तसंच या मार्केटमधून तुम्ही शेअर्स खरेदी करता. व्यापारी कुठल्याही मार्केटमध्ये जसं भाजी विकू शकतो. तसंच कंपन्या BSE किंवा NSE मध्ये लिस्ट होऊ शकतात. आणि तुम्ही जसं कुठल्याही मार्केटमधून भाजी घेऊ शकता, तसंच शेअर्सही तुम्ही कुठल्याही स्टॉक एक्स्चेंजमधून घेऊ शकता.

शेअर मार्केटमधल्या सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी समजून घ्या…सेन्सेक्स आणि निफ्टी.

Tokyo Olympic 2020 : हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ का नाही? का भारताला एकही राष्ट्रीय खेळ नाही? समजून घ्या

3. दुसरा महत्वाचा निर्देशांक म्हणजे NIFTY

जसं सेनसिटीव्ह इंडेक्स म्हणजे सेन्सेक्स तसं नॅशनल फिफ्टी म्हणजे निफ्टी. सेन्सेक्स हा जसा BSE चा निर्देशांक, तसा NSE चा निफ्टी हा निर्देशांक आहे. नॅशनल फिफ्टी असं म्हटलं जातं? तर जसं BSE मध्ये 30 कंपन्या लिस्टेड असतात, तसं NSE मध्ये 50 कंपन्या लिस्टेड असतात, म्हणून त्याला नॅशनल फिफ्टी म्हणतात.

BSE काय आणि NSE काय, यात ज्या कंपन्या लिस्टेड झालेल्या असतात त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या असतात. ऑटोमोबाईल, उर्जा, आरोग्य, बँक वगैरे.

Coal Shortage in Maharashtra : भारताला कोळशाची किती गरज? काय कारणं आहेत तुटवड्याची? समजून घ्या

आता कुठली कंपनी लिस्टेड आहे, तुम्ही कुठल्या कंरन्यांचे शेअर्स घेऊ शकता हे सगळं कसं कळेल?

तर त्यासाठी कंपन्यांचा IPO initial public offering येतोय ह्याकडे तुम्ही लक्ष ठेवायला हवं. आयपीओ म्हणजे काय तर आर्थिक फायद्यासाठी कोणती कंपनी पहिल्यांदाच शेअर्स जारी करते तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात.

शेअर्सची किंमत कमी असते तेव्हा शेअर्स घेतले जातात, आणि त्याची किंमत वाढते तेव्हा ते विकले जातात, यातच अनेकांचा नफा होतो. पण प्रत्येक शेअरची किंमत वाढेलच असं नाही. कंपन्यांच्या कामगिरीवर शेअर्सची किंमत वर-खाली होत असते. यात मोठ्या प्रमाणात तोटा होण्याचीही भीती असते. त्यामुळे तुम्ही कोणता शेअर कोणत्या वेळी घेताय, शेअर घेताना त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, कसा राहू शकतो, त्याची उलाढाल कशी सुरू आहे? त्यांचं भविष्याची वाटचाल कशी राहू शकते, या सगळ्या गोष्टी पाहून, जाणकारांची मत जाणून मगच शेअर्सची खरेदी करणं गरजेचं आहे.

शेअर्समध्येही सरकार टॅक्स आकारतं. काही अमूक दिवसांकरता तुम्ही शेअर्स तुमच्याकडे ठेवलेत तर टॅक्स लागत नाही, पण त्याआधीच तुम्ही ते शेअर्स विकले, तर मात्र सरकारला तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो.

आता या सगळ्यावर नियंत्रण कोण ठेवतं? तर त्यासाठी आहे SEBI. Securities and Exchange Board of India. शेअर बाजारात कुठले गैरव्यवहार तर होत नाहीयेत ना, इनसाईड ट्रेडिंग होत नाहीयेत ना, कुणाला IPO अप्रूव्ह करायचाय हे सगळ्यांचं नियमन SEBI करतं. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अख्त्यारित SEBI काम करतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT