मुंबई: चोरी करण्यासाठी 2000 किमी विमानाने प्रवास... 'या' चोराची विचित्र कहाणी वाचून चक्रावून जाल!
मुंबई पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, जो चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करायचा. पोलिसांनी या चोरीचं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर, या अनोख्या आणि विचित्र पद्धतीने चोरी करणाऱ्या चोराची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चोरी करण्यासाठी 2000 किमी विमानाने प्रवास...
'या' चोराची विचित्र कहाणी वाचून चक्रावून जाल!
Mumbai Crime: नवी मुंबई पोलिसांनी एका अशा चोराला अटक केली आहे, जो चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करायचा. पोलिसांनी आरोपीकडून 12 लाख रुपयांचे दागिने सुद्धा जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी व्यक्ती चोरी करून झाल्यानंतर विमानाने परत यायचा. पोलिसांनी या चोरीचं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर, या अनोख्या आणि विचित्र पद्धतीने चोरी करणाऱ्या चोराची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आसामचा रहिवासी असलेला हा चोर एक कुख्यात गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
12.57 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने...
पोलिसांनी या चोराकडून 12 लाखांहून अधिक किमतीचे दागिने जप्त केले आहेत. तसेच, संबंधित आरोपीने MMR (मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन) मध्ये एकूण 33 गुन्ह्यांची कबूली दिली आहे. नवी मुंबईतील नेरुळ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आसाममधील रहिवासी असलेला आरोपीचं नाव मोईनुल अब्दुल मलिक इस्लाम असून त्याने नुकतंच जवळपास पाच घरांमध्ये घरफोडी केली होती. पोलिसांनी आरोपीकडून 12.57 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 15 डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार...
चोर विमानाने आसामहून मुंबईला जायचा
संबंधित चोरीच्या प्रकरणासंदर्भातील पोलिसांच्या तपासात असं दिसून आलं आहे की आसामच्या होजई जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोईनूल हा एक कुख्यात गुन्हेगार आहे. आरोपी विमानाने आसामहून मुंबईला जायचा, त्यानंतर तिथे स्वस्त वसतिगृहात राहायचा आणि चोरी करण्यासाठी निवासी भागात बंद घरांचा शोध घ्यायचा. त्यानंतर, तो त्या घरांमध्ये घरफोडी करायचा. या चोरीच्या पद्धतीचा खुलासा झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. आता संबंधित आरोपीला अटक केल्यानंतर तो या प्रकरणात एकटाच आहे की आणखी कोणी या पद्धतीचं अनुसरण करत आहे याचा पोलीस तपास करत आहे.
हे ही वाचा: Delhi Blast: स्फोटाआधी डॉ. उमरने केलेला 'भाभीला' फोन... दोघांमधलं 'ते' बोलणं आलं समोर?
सोनार बनून चोरीचे दागिने विकायचा
आरोपीने नेरुळ पोलिस हद्दीत 4 आणि रबाळे पोलिस हद्दीत 1 चोरी केली असल्याची माहिती आहे.त्याच्याविरुद्ध नवी मुंबईत 11 आणि ठाणे पोलीस आयुक्तालयात 22 गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. यावरून तो एक व्यावसायिक चोर असल्याचे सिद्ध झालं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी चोरी केल्यानंतर सोनार म्हणून वेष बदलून चोरीचे दागिने स्थानिक पातळीवर विकायचा. त्यानंतर, त्याची रोख रक्कम मिळाल्यानंतर तो आसामला परत पळून जायचा. 4 सप्टेंबर रोजी नेरुळ येथील साई-छाया भवन येथे झालेल्या चोरीनंतर त्याचा खुलासा करण्यात आला. तिथे अंदाजे 4.95 लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.










