प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?; पक्ष नेतृत्वासमोर मांडली विजयाची ‘रणनीती’
मागील काही दिवसांपासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेतृत्वामध्ये चर्चा सुरू असून, काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस सातत्याने पराभवाला सामोरं जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी विजयासाठीची रणनीती मांडली आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व पक्षाला सक्षम करू शकलं नाही. त्यानंतर G23 तले नेते उघडपणे […]
ADVERTISEMENT

मागील काही दिवसांपासून राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेतृत्वामध्ये चर्चा सुरू असून, काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस सातत्याने पराभवाला सामोरं जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी विजयासाठीची रणनीती मांडली आहे.
राहुल गांधी यांचं नेतृत्व पक्षाला सक्षम करू शकलं नाही. त्यानंतर G23 तले नेते उघडपणे पक्षावर टीका करू लागले. काँग्रेसची अवस्था नादुरूस्त हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे असं शरद पवारांनीही सांगितलं. यानंतर २०२४ च्या निवडणुकांसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा होऊ लागली. अशात रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला फिनिक्स भरारी घेण्यासाठी नवा फॉर्म्युला सांगितला आहे.
काय म्हटलं आहे प्रशांत किशोर यांनी?
इंडिया टुडेच्या हाती प्रशांत किशोर यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्याचा काही भाग आला आहे. त्यात प्रशांत किशोर यांनी काय मांडलं आहे आपण पाहू.










