Twitter, Facebook आणि What’s App चं भारतात काय होणार?
Twitter, Facebook आणि What’s App चं नेमकं काय होणार? हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याचं कारण सरकारने सोशल मीडियाला दिलेली तीन महिन्यांची मुदत दिलेली मुदत ही 25 मे रोजी संपते आहे. 25 फेब्रुवारीला ही मुदत देण्यात आली होती. या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 50 लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स आहेत. त्यामुळे या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी […]
ADVERTISEMENT

Twitter, Facebook आणि What’s App चं नेमकं काय होणार? हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. याचं कारण सरकारने सोशल मीडियाला दिलेली तीन महिन्यांची मुदत दिलेली मुदत ही 25 मे रोजी संपते आहे. 25 फेब्रुवारीला ही मुदत देण्यात आली होती. या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 50 लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबर्स आहेत. त्यामुळे या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी नियमांचं पालन केलं पाहिजे. या सगळ्या कंपन्यांना नियमांचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने सगळ्या सोशल मीडिया कंपन्यांना नव्या नियमांचं पालन करण्यासाठी ही मुदत दिली होती.
यामध्ये भारतात आपला ऑफिसर आणि त्याचा पत्ता देणं, कंपलायंस अधिकारी नेमणं, लोकांच्या तक्रारीचं निवारण करणं, वादग्रस्त माहितीवर लक्ष ठेवणं, कंप्लायन्स रिपोर्ट आणि वादग्रस्त पोस्ट, ट्विट, मेसेज. फोटो हटवणं अशा सारख्या नियमांचा समावेश आहे. सोशल मीडियावर जे पीडित आहेत त्यांनी त्यांची तक्रार कुठे करायची? त्यांच्या तक्रारींचं निवारण कसं होईल? याककडे लक्ष दिलं पाहिजे. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी यासाठी सहा महिन्यांची मुदत मागितली आहे. तर काही कंपन्यांचं म्हणणं हे आहे की अमेरिकेत असलेल्या मुख्यालयाकडून येणाऱ्या निर्देशांची आम्ही वाट पाहतो आहोत. या कंपन्या भारतात काम करत आहेत, भारतातून नफा कमवत आहेत. मात्र नियम पाळण्यासाठी अमेरिकेच्या निर्देशांची वाट बघतात. ट्विटरसारख्या कंपन्या या स्वतः फॅक्ट चेकर नेमतात. त्या त्यांची ओळख बाहेर आणत नाहीत आणि त्या कशाप्रकारे काम करत आहेत हेदेखील बाहेर आणत नाहीत.
चांगले उपचार मिळाले असते तर…; फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर अभिनेता राहुल वोहराचं निधन
सरकारने दिलेल्या मुदतीनंतर काय बदल घडू शकतात?