काँग्रेसची सत्ता असताना आकाशवाणी, दूरदर्शनने वीर सावरकरांच्या कार्यक्रमांवर बंदी आणली होती का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभेतील भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसनं किती अन्याय केला याची वेगवेगळी उदाहरणं दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर बोलताना त्यांनी काँग्रेसला अनेक चिमटे काढले. याच पार्श्वभूमीवरही बोलताना मोदी म्हणाले की, हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रसारित केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. हा प्रसंग ऐकल्यानंतर कोणालाही असं वाटेल.. दूरदर्शन आणि आकाशवाणीवर वीर सावरकरांवर कार्यक्रम केला म्हणून काढून टाकलं जायचं आणि त्या कलाकारांवर बंदी आणली जायची आता या सगळ्यानंतर काही प्रश्न उपस्थित राहतात.. की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला दावा खरा आहे का?

काय प्रश्न निर्माण होत आहेत?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आकाशवाणी आणि दूरदर्शनवर स्वांतत्र्यवीर सावरकरांची गाणी,कविता,भाषणं प्रसारित व्हायची नाहीत का?

त्या काळात देशात सत्तेवर असलेली कॉग्रेस सावरकरांची कोणतीही गोष्ट आकाशवाणी आणि दूरदर्शन वर प्रसारित करायला विरोध करायची का?

ADVERTISEMENT

हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यानंतर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर एकदाही सावरकरांवर कार्यक्रम केला नाही का? या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..

ADVERTISEMENT

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी असा दावा केला होता की ‘ने मजसी ने परत मातृभूमिला’ ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता मी आकाशवाणीवर ध्वनीमुद्रीत केली आणि त्यामुळे मला आकाशवाणीने आधी कारणे दाखवा नोटीस दाखवली. त्यानंतर ८ दिवसांतच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच गोष्टीचा आधार घेत राज्यसभेत भाषण करताना काँग्रेसला सणसणीत चिमटे काढले. मात्र आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही ठिकाणी सावरकरांच्या कविता किंवा गाणी ध्वनीमुद्रित झाली किंवा त्यावरचे कार्यक्रम आकसापोटी त्यावेळच्या सरकारच्या दबावामुळे झाले नाहीत या आरोपाकडे पाहिल्यास काही वस्तुनिष्ठ पुरावे ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी आपल्या ट्विटमधून समोर आणले आहेत..

राजू परूळेकर यांनी काय म्हटलं आहे?

हृदयनाथ मंगेशकर यांनी आकाशवाणीवर नोकरी केली होती असं त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत साफ खोटं सांगितलं. इतकंच नाही तर वीर सावरकर यांची गीतं गोळवलकर नावाचे प्रोड्युसर पुणे आकाशवाणीत नोकरीला होती. त्यांनी त्यांनी संगीत देऊन आयुष्यभर आकाशवाणीवर वाजवलेली आहेत. लहानपणापासून आपण अनेकदा सावरकरांची गीतं आकाशवाणी, दूरदर्शनवर ऐकत आलेलो आहोत. इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर पोस्टल तिकिट काढलं होतं. काँग्रेसने विरोधकांना सन्मानाने वागवलं आहे. मोदीजी आणि मंगेशकर धादांत खोटं बोलत आहेत.

मधुकर गोळवलकर कोण होते?

संगीतकार मधुकर गोळवलकर आकाशवाणीच्या सेवेत रुजु झाले. संगीतकार म्हणून त्यांनी केलेल्या “स्वतंत्रतेचे स्तोत्र” ही रचना केली. हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी संगीतबद्ध केलेल्या “सागरा प्राण तळमळला” ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर रचित कवितेच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिकेच्या पाठ्च्या बाजुचे गाणे “जयोस्तुते” म्हणुन हे “स्वतंत्रतेचे स्तोत्र” पुढे खूप लोकप्रिय झाले! पुलंच्या गुळाचा गणपती ह्या चित्रपटाचे वाद्यवृंद संयोजन गोळवलकरांनीच केले होते.

हृदयनाथ मंगेशकरांना खरंच आकाशवाणीतून काढून टाकलं का? जाणून घ्या काय म्हणाले होते हृदयनाथ मंगेशकर?

वस्तुस्थिती म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकर,लता मंगेशकर यांचा आकाशवाणीवर १९६० साली तेजो गाथा नावाचा कार्यक्रम प्रसारित झाला होता.. आकाशवाणीचे त्याकाळचे प्रोड्युसर आर एस सावदेकर यांनी हा कार्यक्रम प्रोड्युस केला होता.. असं आकाशवाणी त्याकाळी प्रसारित करत असलेल्या वृत्तपत्रातच छापून आलं आहे आणि या छापील बातमीचं कात्रण राजू परूळेकर यांनी ट्वीट केलं आहे.

यानंतर १९७२ साली दूरदर्शन सुरू झाल्यावर आकाशवाणीचं हेच रेकॉर्डिंग वापरून पुन्हा एकदा सागरा प्राण तळमळला हा दूरदर्शनवर अर्ध्या तासाचा कार्यक्रम दृष्यमाध्यमात पुर्नप्रेक्षपित झाला होता.. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर आजही उपल्बध आहे. दूरदर्शनने हा कार्यक्रम प्रसारित केला होता. ज्यात कवी शंकर वैद्यांनी हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांची याच गाण्याविषयी मुलाखत घेतली होती. त्यानंतर लता मंगेशकर,हृदयनाथ मंगेशकर आणि प्रख्यात गायक अरूण दाते यांनी सागरा प्राण तळमळला हे गाणे वादकांसमवेत सादर केले होते. दूरदर्शनच्या यू ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ आजही आपल्याला पाहायला मिळतो.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नेमका काय वाद सुरू झाला आहे?

आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या दोनही कार्यक्रमावेळी देशात सत्तेत काँग्रेसच होती. जर का सावरकरांची गाणी प्रसारित करण्यावरून पंडित हृदयनाथ मंगेशकरांची नोकरी गेली असा दावा स्वत ते करत असतील, तर समोर आलेले हे २ पुरावे खूप काही स्पष्ट करून जातात. त्या काळातील सत्तेवर असलेल्या काँग्रेसला सावरकरांविषयी आकस असताच तर 1960 मध्ये आकाशवाणीवर आणि पुढे दूरदर्शनवर प्रसारित झालेले कार्यक्रम ज्यात खुद्द हृदयनाथ मंगेशकर सहभागी होते. हे कार्यक्रमही झाले नसते. मात्र तसं न होता पुराव्यानुसार हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसारित झाले आहेत. याबद्दल बोलताना ज्येष्ठ कवी आणि आकाशवाणीवर बरीच वर्ष काम करणाऱ्या महेश केळुसकरांनीही ही गोष्ट स्पष्ट केली आहे की काँग्रेस सत्तेवर असताना अनेकवेळा आकाशवाणीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भाषणं, त्यांच्या कविता, गाणी यावरती खूपवेळा कार्यक्रम प्रसारित झाले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT