जिथे माणूस राक्षस होतो… देशातील 5 मोठ्या दंगलींची थरारक कहाणी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही विशिष्ट समाजात हिंसाचार भडकत आहेत. राम नवमी आणि हनुमान जयंतीला काढण्यात आलेल्या अनेक रॅलीमध्ये असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे देशातील वातावरण अधिक गढूळ होत चाललं आहे.

राजधानी दिल्ली, महाराष्ट्रातील अचलपूर येथे दोनच दिवसांपूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला. ज्यामुळे इथे संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. देशात यापूर्वीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. पण असं असलं तरी देशातील पाच दंगलींमध्ये माणसाने मृत्यूचा अक्षरश: नंगानाच केला होता. ज्याने अवघा देश त्या-त्या वेळी हादरुन गेला होता. चला तर मग आज जाणून घेऊया देशातील पाच मोठ्या दंगलींबद्दल ज्यात शेकडो निष्पाप लोकांना आपला हकनाक जीव गमवावा लागला होता.

1. शीख दंगल (1984)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देशातील प्रमुख दंगलींपैकी एक म्हणजे 1984 ची शीख दंगल. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर हा प्रकार घडला होता. खरे तर त्यांच्या अंगरक्षकानेच इंदिरा गांधींची हत्या केली होती. ज्या दोन अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची हत्या केली ते दोघेही शीख होते. त्यामुळेच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशातील लोक शिखांच्या विरोधात अनेक जण भडकले होते.

इंदिरा गांधींची त्यांच्याच शीख अंगरक्षकाने हत्या केल्याचं समजल्यानंतर दिल्लीत मोठी दंगल उसळली होती. ज्यामध्ये शिखांची अक्षरश: कत्तल करण्यात आली होती. या दंगलींमध्ये पाच हजार लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं. एकट्या दिल्लीत दोन हजारांहून अधिक लोक मारले गेले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

इंदिरा गांधींच्या हत्येचे कारण म्हणजे 1984 मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान त्यांनी घेतलेला निर्णय. ज्यात त्यांनी भारतीय सैन्याला सुवर्ण मंदिर ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. यावेळी मंदिरात घुसलेल्या सर्व बंडखोरांना मारण्यात आले होते. जे बहुतेक शीख होते.

या सर्व सशस्त्र बंडखोरांनी सुवर्ण मंदिर ताब्यात घेतले होते. खलिस्तान नावाचा दुसरा देश हवा अशी त्यांची मागणी होती. जिथे फक्त शीख आणि सरदार समाज राहू शकेल अशी खलिस्तानवाद्यांची मागणी होती. जेव्हा इंदिरा सरकारने सैनिकांना मंदिरात जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे मंदिराच्या आत जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या साथीदारांनी सैनिकांवर हल्ला चढवला होता.

खलिस्तानींची वाढती संख्या पाहता इंदिरा सरकारने तोफांसह कूच करण्याचे आदेश लष्कराला दिले होते. ज्यात जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांचे सहकारी मारले गेले होते. याचाच बदला घेण्यासाठी इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतरच शिखांविरोधात प्रचंड दंगल उसळली होती.

2. भागलपूर दंगल (1989)

भागलपूरची दंगल ही 1947 नंतरच्या भारतीय इतिहासातील सर्वात क्रूर दंगलींपैकी एक होती. ही दंगल भागलपूरमध्ये ऑक्टोबर 1989 मध्ये झाली होती. त्यात प्रामुख्याने हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांचा समावेश होता. यामध्ये 1000 हून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.

3. मुंबई दंगल (1992)

1992 साली मुंबईत उसळलेली दंगल ही अत्यंत भीषण अशी होती. याआधी मुंबईने कधीही अशा स्वरुपाचा हिंसाचार पाहिला नव्हता. या दंगलीचे मुख्य कारण म्हणजे बाबरी मशीद पाडणे हा होता. हा हिंसाचार डिसेंबर 1992 मध्ये सुरू झाला आणि जानेवारी 1993 पर्यंत सुरु होता.

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालानुसार डिसेंबर 1992 आणि जानेवारी 1993 या दोन महिन्यांत झालेल्या दंगलीत तब्बल 900 लोक मारले गेले. त्यात 575 मुस्लिम, 275 हिंदू, 45 अनोळखी आणि इतर पाच जण होते. सुधाकर नाईक यांचे काँग्रेस सरकार या दंगलींवर नियंत्रण ठेवण्यास पूर्णपणे असमर्थ ठरले होते. त्यामुळेच अखेर लष्कराला पाचारण करावे लागले होते. याच दंगलीनंतर 1993 साली मार्च महिन्यात साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. ज्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हादरुन गेली होती.

4. गुजरात दंगल (2002)

गुजरातमधील गोध्रा दंगल ही देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण दंगल होती. 2002 मध्ये गोध्रा दंगल घडली होती. 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती ट्रेनचा एस-6 डबा जमावाने जाळून टाकला होता. ज्यामध्ये 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगली सुरू झाल्या होत्या.

खरे तर हिंदूंनी कारसेवकांचे मृतदेह घेऊन प्रचंड मोठ्या अंतयात्रा काढण्यास सुरुवात केली होती. 10 मृतदेह घेऊन अंतिम यात्रा रामोल जनता नगर ते हटकेश्वर स्मशानभूमीपर्यंत नेण्यात आली. ज्यामध्ये तब्बल 6 हजार लोक सहभागी होते.

अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटी, नरोडा गावाजवळ अंतयात्रेतील गर्दी अचानक हिंसक झाली आणि भीषण दंगलीला इथूनच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यानंतर संपूर्ण गुजरात राज्यात दंगल भडकली होती. या दंगलीत 790 मुस्लिम आणि 254 हिंदूंचा मृत्यू झाला होता. या दंगलीच्या काळात देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते.

5. मुझफ्फरनगर (2013)

मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कवाल गावात जाट-मुस्लिम हिंसाचाराने दंगलीला सुरूवात झाली होती. ज्यामध्ये 62 लोकांचा मृत्यू झाला होता. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती.

Amravati Violence : अचलपूर-परतवाडात रात्री काय घडलं?; सध्या काय आहे स्थिती?

खरं तर, 27 ऑगस्ट 2013 रोजी कवाल गावात एका मुस्लिम तरुणाने जाट समुदायाच्या मुलीचा विनयभंग केला होता. यानंतर विनयभंग झालेल्या मुलीच्या चुलत भावाने मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण केली होती. प्रत्युत्तर म्हणून मुस्लिम तरुणाने मुलीच्या भावाचा जीव घेतला होता. याच सगळ्या प्रकारामुळे मुझफ्फरनगरमध्ये 2013 साली भीषण दंगल उसळली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT