संजय राऊतांवर गुन्हा दाखल करणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत?

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.
संजय राऊतांवर गुन्हा दाखल करणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत?

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांच्या निकटवर्तीयांचा सहभाग असल्याची माहिती आहे. काल तब्बल १६ तास चौकशी केल्यानंतर संजय राऊतांनी अटक करण्यात आली होती. आता स्वप्ना पाटकर या त्यांच्या माजी सहकारी असलेल्या महिलेनेही त्यांच्यावर टीका केली आहे.

या घडामोडींदरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात त्यांच्या माजी सहकारी स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांनी शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. पाटकर हे पत्रा चाळ प्रकरणातील साक्षीदार आहेत. आयपीसीच्या कलम ५०९, ५०६ आणि ५०४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. संजय राऊत यांनी पूर्वीचे विधान मागे घेण्यासाठी धमकी दिली होती असे स्वप्ना पाटकर यांनी ईडीला सांगितले आहे.

संजय राऊतांवर गुन्हा दाखल करणाऱ्या स्वप्ना पाटकर कोण आहेत?

स्वप्ना पाटकर या ४० वर्षीय महिला असून त्या मुंबईतील सांताक्रूझ भागात राहतात. त्या व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ आहेत तसेच मुंबईच्या उपनगरात स्वतःचे क्लिनिक चालवतात. २००७ मध्ये सामना येथे स्वप्ना पाटकर यांची संजय राऊत यांच्याशी ओळख झाल्याची माहिती समोर आली आहे. राऊत त्यावेळी सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक होते.

संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यात काय बिनसलं?

स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2007 मध्ये राऊत यांच्या भेटीनंतर आमचे कौटुंबिक संबंध घट्ट होत गेले. पुढे स्वप्ना यांनी आरोप केला की संजय राऊतांना त्या बिझनेस पार्टनर म्हणून हव्या परंतु त्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे संजय राऊत नाराज झाले.

स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे की 20 नोव्हेंबर 2016 रोजी त्या सामना कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला गेल्या असता संजय राऊतांनी त्यांचा हात धरला आणि त्यांच्यावर ओरडले. प्रत्युत्तरात स्वप्ना पाटकरांनी राऊतांनी कॉलर पकडली. त्यानंतर संजय राऊतांनी स्वप्ना पाटकर यांना पोलीस कारवाईची धमकी दिल्याचा आरोप पाटकरांनी केला आहे. विशेष म्हणजे, स्वप्ना पाटकर यांचे पती सुजित पाटकर हे देखील संजय राऊत यांच्या जवळचा सहकारी असून त्यांनी पत्नीच्या नावावर काही मालमत्ता खरेदी केल्या होत्या.

त्या व्हायरल क्लिपमुळे संजय राऊतांवर गुन्हा दाखल

दरम्यान व्हायरल झालेली एक ऑडिओ क्लिप स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्यातील संभाषण असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये समोरील पुरुष शिवीगाळ करताना आणि महिलेला धमकावताना ऐकू येत आहे. याच मुद्द्यावर आता स्वप्ना पाटकर यांनी एफआयआर नोंदवला आहे.

ईडीने संजय राऊतांना अटक केलेले प्रकरण काय?

या वर्षी एप्रिलमध्ये ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, प्रवीण राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या 11.15 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीला असा संशय आहे की स्वप्ना पाटकर आणि राऊत यांच्या पत्नीने अलिबाग येथे जी जमीन खरेदी केली जी पत्रा चाळ घोटाळ्याच्या पैशातून खरेदी केली गेली होती. ईडीने यापुर्वीच पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला आहे.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्यांचा काय संबंध?

दरम्यान, स्वप्ना पाटकर या लोकांना भेटत नाही किंवा प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. पत्रा चाळ घोटाळा प्रकरण अनेकदा समोर आणणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांची भेट घेऊन स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्याची विनंती केली होती. एफआयआर दाखल होताच सोमय्या यांनी ट्विट केले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in