Ganesh Utsav 2022 : सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला? लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी?

वाचा नेमका काय आहे वाद?, या वादाला सुरूवात नेमकी कशी झाली?
लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी
लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारीGanesh chaturthi 2021

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला हा प्रश्न कुणीही विचारला तर कुणीही सांगेल याचं उत्तर लोकमान्य टिळक हेच याचं उत्तर आहे. मात्र पाच वर्षांपूर्वी गणेशोत्सव नेमका कुणी सुरू केला याचा वाद सुरू झाला. गणेशोत्सवाचे जनक नेमके कोण? लोकमान्य टिळक की भाऊसाहेब रंगारी? असा हा वाद सुरू झाला. आपण जाणून घेऊ याचविषयी.

भारत पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली आणि स्वातंत्र्य चळवळ त्यातून सुरू केली हे आपल्याला माहित आहेच. मात्र सुरूवात कुणी केली याचा वाद 2017 मध्ये समोर आला.

पुण्यातील गणेशोत्सव
पुण्यातील गणेशोत्सव फोटो-फेसबुक

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना समोर आणली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीची ज्योत पेटवली. मात्र लोकमान्य टिळक नव्हे तर भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वात आधी गणेशोत्सव सुरू केला असा दावा भाऊ साहेब रंगारी ट्रस्टने केला.

काय म्हटलं आहे भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने?

'लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरूवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षे आधी म्हणजेच 1892 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला'

कोण होते भाऊसाहेब रंगारी होते ?

भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायाने वैद्य होते. त्यांच्या दुमजली घरात धर्मार्थ दवाखाना होता. रूग्णसेवेचं व्रतच त्यांनी घेतलं होतं. अध्यात्मिक क्षेत्राचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. संत जंगली महाराज यांच्याशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते, भाऊसाहेबांचा पारंपारिक व्यवसाय शालूंना रंग देण्याचा होता त्यामुळे त्यांना रंगारी असं संबोधलं जाऊ लागलं.' महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोशात भाऊसाहेब रंगारी यांच्या नावाचा समावेश आहे.

कशी होती पहिली मूर्ती?

भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 मध्ये गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली. राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणाऱ्या गणेशाची ही मूर्ती तिचं वेगळेपण दाखवणारी आहे. लाकूड, भुसा यांचा वापर करून ही मूर्ती तयार करण्यात आली. अद्यापही ही मूर्ती बदलण्यात आलेली नाही असं जाणकर सांगतात.

भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपती
भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणपतीफोटो- फेसबुक

लोकमान्य टिळकांनी कधी केली सुरूवात?

1894 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यातील विंचूरकर वाड्यात गणपतीची स्थापना केली. त्या वर्षी म्हणजेच 1894 मध्ये पुण्यात शंभरहून अधिक सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली होती. केसरी या टिळकांच्या वृत्तपत्रातही गणेशोत्सवाबाबत लिहिण्यात आलं होतं.

ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी काय म्हटलं होतं?

सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक हा प्रश्न चर्चिला जातो. मात्र यातून ब्राह्मण आणि ब्राह्मणतेर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केलेला गणेशोत्सव हा पुण्यापुरता मर्यादित राहिला तर लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला गणेशोत्सव देशभरात पोहचला. रंगारी हे संस्थापक आणि लोकमान्य टिळक हे प्रसारक होते असं श्रीपाल सबनीस यांनी 2019 मध्ये पुण्यात केलेल्या एका भाषणात म्हटलं होतं.

पुण्यातील गणेशोत्सव
पुण्यातील गणेशोत्सवफोटो-फेसबुक

लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांचा कालखंड एकच होता. त्या दोघांमधले संबंधही हिताचे होते असं अनेक जुने-जाणते लोक सांगतात. 2017 मध्ये पुणे महापालिकेने सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाल्याने मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आणि हा वाद सुरू झाला. सार्वजनिक गणेशोत्सव नेमका सुरू कोणी केला भाऊसाहेब रंगारी की लोकमान्य टिळक हा वाद 2017 मध्ये निर्माण झाला. 1892 मध्ये भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने गणेशोत्सव सुरू केला होता असं म्हणत महापालिकेला नोटीसही पाठवली होती. ऐतिहासिक घटनांना बगल देऊन लोकांच्या पैशांचा अपव्यय करणं अयोग्य असल्याचं त्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in