भारतीय लोक दारू पाण्याशिवाय का पिऊ शकत नाहीत?; तज्ज्ञांनी सांगितलं कारण
सर्वसामान्य भारतीय पाण्याविना दारू पिण्याची कल्पनाही करू शकत नाही. दारूसोबत पाणी आणि सोडा यांचे हे अतूट नाते दारू कंपन्याही दाखवतात. कदाचित त्यामुळेच या कंपन्या टीव्ही-वृत्तपत्रांमध्ये दारूच्या जाहिरातींवर बंदी असतानाही पाणी, सोडा या ब्रँडच्या रूपात जाहिरात करतात . आपला हेतू टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहचवतात. भारतीय व्हिस्कीत मोलॅसिसचा वापर कॉकटेल इंडिया या यूट्यूब चॅनेलचे संस्थापक संजय घोष उर्फ […]
ADVERTISEMENT

सर्वसामान्य भारतीय पाण्याविना दारू पिण्याची कल्पनाही करू शकत नाही. दारूसोबत पाणी आणि सोडा यांचे हे अतूट नाते दारू कंपन्याही दाखवतात. कदाचित त्यामुळेच या कंपन्या टीव्ही-वृत्तपत्रांमध्ये दारूच्या जाहिरातींवर बंदी असतानाही पाणी, सोडा या ब्रँडच्या रूपात जाहिरात करतात . आपला हेतू टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहचवतात.
भारतीय व्हिस्कीत मोलॅसिसचा वापर
कॉकटेल इंडिया या यूट्यूब चॅनेलचे संस्थापक संजय घोष उर्फ दादा बारटेंडर यांनी याचे आश्चर्यकारक कारण सांगितले आहे. घोष यांच्या मते, भारतातील अनेक व्हिस्की कंपन्या ते तयार करण्यासाठी मोलॅसिस किंवा शिरेचा वापर करतात. रम सहसा या मोलॅसेसपासून बनवली जाते. भारतात यावर सध्या कोणतीही कायदेशीर बंदी नसल्यामुळे, भारतीय व्हिस्की ब्रँड मॉल्टसह मोलॅसेस वापरतात.
भारतीय व्हिस्कीत मोलॅसिसचा वापर