supertech twin tower demolition : 800 कोटींची 32 मजली टॉवर्स बिल्डरला का पाडावी लागली?
नोएडातील सेक्टर-९३ ब येथील एमराल्ड कोर्ट परिसरातील सुपरटेकचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आज मातीत मिसळला. ८०० कोटी बाजार मूल्य असलेली ३२ मजली टॉवर्स पाडण्याची देशातील ही पहिलीच वेळ घटना. त्यामुळेच supertech twin towers ची देशात चर्चा सुरू होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुपरटेकची ट्विन टॉवर्स (अपेक्स आणि सियान) पाडण्याची कारवाई करण्यात आलीये. गेल्या अनेक काळापासून चर्चेत असलेली नोएडातील […]
ADVERTISEMENT

नोएडातील सेक्टर-९३ ब येथील एमराल्ड कोर्ट परिसरातील सुपरटेकचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आज मातीत मिसळला. ८०० कोटी बाजार मूल्य असलेली ३२ मजली टॉवर्स पाडण्याची देशातील ही पहिलीच वेळ घटना. त्यामुळेच supertech twin towers ची देशात चर्चा सुरू होती. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुपरटेकची ट्विन टॉवर्स (अपेक्स आणि सियान) पाडण्याची कारवाई करण्यात आलीये.
गेल्या अनेक काळापासून चर्चेत असलेली नोएडातील ट्विन टॉवर्सच्या खुणाच शिल्लक राहिल्यात. रविवारी (२८ ऑगस्ट) दुपारी अडीच वाजता स्फोटक लावून ३२ मजली सुपरटेकची ट्विन टॉवर्स पाडण्यात आली.
असा आहे सुपरटेक ट्विन टॉवर्स प्रकरणाचा इतिहास (supertech twin tower case history)
२३ नोव्हेंबर २००४ रोजी सुपरटेकने एमराल्ड कोर्टसाठी नोएडा प्राधिकरणाने जमीन संपादित केली. यापैकी ८४,२७३ चौरसमीटर जमीन सुपरटेक बिल्डरला देण्यात आली. १६ मार्च २००५ रोजी लीज डीड (मूळ जमीन मालक आणि भाडेतत्वावर जमीन घेणारा व्यक्ती यांच्यातील करार) झाली. जमिनीचं मोजमाप करताना प्लॉट नंबर ४ जवळ ६.५५.६१ चौरस मीटर जागेचा तुकडा अधिकचा निघाला. हा तुकडा बिल्डरने स्वतःच्याच नावे करून घेतला. त्यासाठी २१ जून २००६ रोजी लीज डीड झालं. दोन्ही प्लॉट्सचा नकाशा वेगवेगळा असताना तो एकच प्लॉट दाखवला गेला. याच जागेवर सुपरटेकने एमराल्ड कोर्ट प्रोजेक्ट सुरू केला.
११ मजल्यांचे १६ टॉवर्स उभारण्याची होती योजना
या प्रोजेक्टमध्ये बिल्डरने ग्राऊंड फ्लोअर व्यतिरिक्त ११ मजल्यांचे १६ टॉवर्स उभारण्याची योजना तयार केली होती. जिथे ३२ मजली ट्विन टॉवर्स उभारण्यात आले, तिथे नकाशाप्रमाणे ग्रीन पार्क दाखवण्यात आला होता.