गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले….
गोवा विधानसभेची निवडणूक होण्यासाठी आता जेमतेम एक महिना उरला आहे. 14 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे. अशात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसंच गोव्यातले स्थानिक पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देणार का? महाराष्ट्रात महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला ज्यामुळे भाजपचे सर्वाधिक आमदार येऊनही त्यांना विरोधात बसावं लागलं. आता असाच प्रयोग गोव्यात […]
ADVERTISEMENT

गोवा विधानसभेची निवडणूक होण्यासाठी आता जेमतेम एक महिना उरला आहे. 14 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार आहे. अशात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तसंच गोव्यातले स्थानिक पक्ष एकत्र येऊन भाजपला टक्कर देणार का? महाराष्ट्रात महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला ज्यामुळे भाजपचे सर्वाधिक आमदार येऊनही त्यांना विरोधात बसावं लागलं. आता असाच प्रयोग गोव्यात केला जाणार का? याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई तकशी संवाद साधला आहे. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं आहे.
भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला! मायकल लोबोंनी दिला मंत्रीपदाचा राजीनामा
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
‘काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे. आम्ही नक्कीच काही काळापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे. आमच्यापेक्षा गोव्यात काँग्रेसचं बळ जास्त आहे यात काही शंकाच नाही. काँग्रेसचे अनेक माजी मुख्यमंत्री कोलांटउड्या मारत असतात. त्यांचे आमदारही मोठ्या प्रमाणात होते. शिवसेनाही गोव्यात बरंच काम करते आहे. निवडणुका जिंकणं किंवा न जिंकणं हा सगळा नंतरचा भाग झाला. आमचा पक्ष जमिनीवर काम करतो आहे.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.