नो सेलिब्रेशन! पुन्हा घरातच बसावं लागणार?; आरोग्यमंत्री टोपेंनी दिले कडक निर्बंधांचे संकेत
महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले 1377 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागणार का? असा प्रश्न राजेश टोपेंना विचारण्यात आला. त्यावेळी वाढत्या कोरोना रूग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच त्यांनी या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे. सांगली : मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय ठरलं […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले 1377 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागणार का? असा प्रश्न राजेश टोपेंना विचारण्यात आला. त्यावेळी वाढत्या कोरोना रूग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच त्यांनी या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे.
सांगली : मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय ठरलं कोरोना हॉटस्पॉट; 47 विद्यार्थीनी ‘पॉझिटिव्ह’
नेमकं काय म्हणाले आहेत राजेश टोपे?
राज्यात वाढणारी कोरोना रूग्णांची संख्या ही धोक्याची घंटा आहे. केंद्राची टीम दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. ही टीम वाढलेले रूग्ण, त्यांचे प्रमाण, ओमिक्रॉनचे पॉझिटिव्ह रूग्ण, लसीकरण, पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या या सगळ्या विषयांचं अवलकोन करणार आहे. राज्यात 87 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 57 टक्के आहे. आतापर्यंत 8 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बोस्टर डोस देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या व्यक्तीला कोव्हॅक्सीनचाच बूस्टर डोस द्यायचा की आणखी कुठला, याचे मार्गदर्शन आयसीएमआरकडे मागितले आहे. ते ज्या सूचना देतील, त्यानुसार पालन केले जाईल. मात्र, लसीकरणासाठी स्थानिक नेते, प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे. स्थानिक नेत्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.